जम्मू : पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाया आणि घुसखोरी सुरुच असते. पाकिस्तानने भारतविरोधात कट, कारस्थान करण्यासाठी आता लहान मुलांचा बळी देण्याची योजना आखली आहे. जम्मू काश्मीरमधली पुंछमध्ये सापडलेल्या पाकिस्तानी मुलाने केलेल्या घुसखोरीच्या दाव्यामुळे भारतीय सुरक्षायंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
पाकिस्तानातून सीमा पार करुन भारतात घुसणाऱ्या एका पाकिस्तानी मुलाला जम्मू काश्मीरच्या पुंछमध्ये जवानांनी पकडलं. हा मुलगा पाकव्याप्त काश्मीरमध्ये रात्रीच्या वेळेस सीमा ओलांडून भारतात घुसला होता. भारतीय जवानांनी या अल्पवयीन मुलाला पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर मुलाने सांगितलं की, आठ जणांच्या एका ग्रुपने मला भारतात घुसखोरी करण्यास सांगितले आहे.
पाकिस्तानी मुलाने केलेल्या गौप्यस्फोटानंतर भारतीय सुरक्षायंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यामुळे लहान मुलांचा वापर करुन बेबी बॉम्ब अटॅक करण्याची पाकिस्तानची योजना तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जाता आहे. याआधी पाकिस्तानने घुसखोरांना थर्मल सूट दिल्याची माहिती समोर आली होती. यामुळे भारताच्या दहशतवाद विरोधातील कारवाईमध्ये मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे भारत-पाक सीमावरील सध्याची परिस्थिती तणावग्रस्त आहे.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पाकिस्तानची नवी खेळी; भारताला 'बेबी बॉम्ब'चा धोका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Jun 2018 12:45 PM (IST)
पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाया आणि घुसखोरी सुरुच असते. पाकिस्तानने भारतविरोधात कट, कारस्थान करण्यासाठी आता लहान मुलांचा बळी देण्याची योजना आखली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -