नवी दिल्ली : पुणतांब्यांतल्या ऐतिहासिक शेतकरी संपाची संकल्पना मांडणारे शेतकरी धनंजय धोर्डे यांचा राजधानी दिल्लीत सन्मान करण्यात आला. काल देशाचे माजी पंतप्रधान व्ही पी सिंह यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय किसान मंचाकडून देशभरातल्या 15 शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आलं. यात महाराष्ट्रातून धनंजय धोर्डे यांचा समावेश होता.


दिल्लीतल्या काँन्सिट्युशन क्लबमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला. जेडीयूचे माजी खासदार शरद यादव या सोहळ्याला उपस्थित होते.

गेल्या वर्षी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी ऐतिहासिक संप पुकारला होता. या संपाची संकल्पना धनंजय धोर्डे यांनी मांडली होती.



धनंजय धोर्डे हे औरंगाबाद जिल्ह्यातल्या डोणगावचे शेतकरी आहेत. काल हा देशपातळीवरचा पुरस्कार त्यांनी तमाम शेतकरी बांधवांना अर्पण केला.

लवकरच दुधाच्या प्रश्नावर आपण लक्षणीय आंदोलन पुकारणार असल्याची माहिती त्यांनी पुरस्कार सोहळ्यानंतर एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली.