PM Modi Cabinet, EXCLUSIVE: आज संध्याकाळी  मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार आहे. मोदी कॅबिनेटमध्ये देशभरातील अनेक नेत्यांची वर्णी लागणार आहे.  याच पार्श्वभूमीवर दिल्लीत वेगवान घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. मोदी सरकार 2.0 मध्ये अद्याप तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या मोदी कॅबिनेटमध्ये अनेक ज्येष्ठ मंत्र्यांवर अधिकच्या खात्यांचा प्रभार आहे. त्यांच्यावरील जबाबदारी कमी करुन नव्या मंत्र्यांकडे हा कार्यभार दिला जाणार आहे. 


मोदी मंत्रिमंडळात 12 अनुसूचित जाती प्रवर्गातील मंत्री असतील यातील  8 कॅबिनेट मंत्री असतील जे आठ वेगवेगळ्या राज्यातील असतील. अनुसूचित जनजातीमधील 8  मंत्री असतील त्यात तीन कॅबिनेट असतील.  ओबीसी प्रवर्गातून 27 मंत्री मोदी मंत्रिमंडळात असतील यातील पाच कॅबिनेट मंत्री असतील अशी सूत्रांची माहिती आहे.  


5 अल्पसंख्यांक मंत्री 
1 मुस्लिम
1 शीख
1 बुद्ध
1 ईसाई
1 जैन 


29 वेगवेगळ्या जातींमधील नेत्यांना मोदी मंत्रिमंडळात स्थान 


11 महिलांना संधी, त्यातील दोन कॅबिनेट मंत्री तर नऊ महिला राज्य मंत्री 


मंत्रिमंडळाचं सरासरी वय 58 वर्ष, 14 मंत्री 50 वर्षाखालील, यापैकी 6 कॅबिनेट मंत्री  


अनुभवाचा फायदा 
 46 मंत्री असे आहेत ज्यांनी आधी मंत्रीपदाचा अनुभव. यातील  23 मंत्री आधी तीन वेळा मंत्री राहिलेले आहेत.  4 माजी मुख्यमंत्री , 18 असे नेते जे राज्यांमध्ये मंत्री होते.  


13 मंत्री पेशाने वकील
6 मंत्री पेशाने डॉक्टर  
5 मंत्री पेशाने इंजीनिअर 
7 मंत्री प्रशासकीय अधिकारी राहिलेले आहेत. 


मोदी मंत्री परिषदमध्ये देशातील वेगवेगळ्या 25 राज्यांना प्रतिनिधित्व 


महाराष्ट्रातली कोकण, खान्देश, मराठवाडा, विदर्भाला प्रतिनिधित्व   


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रीमंडळात  22 चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. 
मिळणार, काहींच्या खातेबदलाचीही शक्यता या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर हे भारताच्या इतिहासातील सर्वात तरुण मंत्रिमंडळ असेल. कारण या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक तरुण चेहऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे, यामुळे मंत्रिमंडळाचे सरासरी वय खूपच कमी होईल, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. 


असं असेल मोदींचं मंत्रिमंडळ 


मंत्रिमंडळ विस्ताराच्या माध्यमातून महिलांचे प्रतिनिधित्व वाढविले जात आहे. प्रोफेशनल, मॅनेजमेंट, एमबीए, पदव्युत्तर युवा नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. मोठ्या राज्यांना अधिक वाटा देण्यात येईल. बुंदेलखंड, पूर्वांचल, मराठवाडा, कोकण या भागांना वाटा देण्यात येईल अशी चर्चा आहे. मंत्रिमंडळात लहान समुदायांना देखील प्रतिनिधित्व दिले जात आहे. यावेळी यादव, कुर्मी, जाट, पासी, कोरी, लोधी इत्यादी समाजाचे प्रतिनिधित्व दिसेल. या विस्तारानंतर दोन डझन ओबीसी किंवा मागासवर्गीय मंत्री यावेळी मंत्रिमंडळात दिसतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. 


अनेक मंत्रिपदं रिक्त 


शिवसेना आणि अकाली दल एनडीएमधून बाहेर निघाले. तसेच रामविलास पासवान आणि इतर काही मंत्र्यांच्या निधनानंतर सर्व मिळून अनेक मंत्रिपदे रिक्त आहेत. सध्या मोदी मंत्रिमंडळात फक्त 53 मंत्री आहेत. तर घटनेनुसार मंत्र्यांची संख्या जास्तीत जास्त 79 असू शकते. त्यामुळे सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात 26 मंत्रिपदं रिक्त आहेत. तिथे कुणाची वर्णी लागणार येत्या दोन दिवसात स्पष्ट होईल.