भोपाळ: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) बोलायला लागले की ऐकणाऱ्यांमध्ये एक वेगळीच उर्जा निर्माण होते, त्यामुळेच मोदी हे सर्वात लोकप्रिय पंतप्रधानांच्या यादीत जाऊन बसतात. मोदींचे शब्द ऐकण्यासाठी लहान मुलांपासून ते वृद्ध नागरिकांपर्यंत गर्दी होते. मोदींच्या मध्य प्रदेशमधील सभेमध्ये अशाच एका लहान मुलाने हजेरी लावली, त्यांच्याकडे पाहून हातवारे करू लागला. त्यावेळी त्या लहान मुलांना मोदींनी असं काही उत्तर दिलं की त्यामुळे त्यांनी उपस्थितांची मनं जिंकली.  


मोदींकडे पाहून बापाच्या खांद्यावर बसलेल्या मुलाने हातवारे केले, त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पंतप्रधान मोदींच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या मुलाला हात खाली घ्यायला सांगितले. तुझे हात दुखतील, हात खाली घे असं मोदी म्हणताना दिसतात. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशमध्ये एका विशाल सभेला संबोधित करत होते. त्यांच्या भाषणादरम्यान त्यांना एक लहान मूल दिसले जे त्यांच्याकडे पाहून हातवारे करत होतं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या मुलाला उद्देशून म्हणाले, मुला, आता हात खाली कर. तुझे प्रेम मला मिळालं, तुझ्या भावना पोहोचल्या. आता हात जास्त हलवू नकोस, नाहीतर तुझे हात आणि खांदे दुखतील. 


 







मध्य प्रदेशातील 7,550 कोटींच्या विकास कामांच्या उद्घाटनानंतर झाबुआ येथील जनजाती महासभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधन केलं.