PM Matru Vandana Yojana: केंद्र सरकारकडून (Central Government) देशातील नागरिकांसाठी नवनवीन योजना जाहीर केल्या जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचे सरकार महिला सक्षमीकरणाला (Women Empowerment) मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे सरकारतर्फे विशेषत: महिलांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. अशातच केंद्र सरकारकडून देशातील गरोदर महिलांना लाभ मिळावा यासाठी सरकार 2017 पासून पंतप्रधान मातृत्व वंदना योजना (Pradhan Mantri Matru Vandana Yojana) राबवत आहे. या योजनेतंर्गत गरोदर महिलांना 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेसाठी महिलांना अर्ज करावा लागतो. या योजनेसाठी अर्ज कसा कराल आणि कोणती कागदपत्रं लागतील? जाणून घेऊयात सविस्तर...
सरकारकडून महिलांसाठी अनेक योजना चालवल्या जातात. परंतु, त्यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना ज्यामध्ये गर्भवती महिलांना 5000 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळते. आपल्या देशात रोजंदारीवर काम करणाऱ्या स्त्रिया गरोदरपणातही कामावर जातात, असं दिसून येतं. त्यामुळे अशा महिलांना आर्थिक सहाय्य करून गरोदरपणात आराम मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काय कराल?
केंद्र सरकारद्वारे राबवण्यात येत असलेल्या पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेंतर्गत पहिल्या अपत्यासाठी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. तर दुसऱ्या अपत्यासाठी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. पण जर दुसरे मूल मुलगी असेल. त्यानंतरच दुसऱ्यांदा योजनेंतर्गत लाभ दिला जातो. पहिल्या मुलासाठी दोन हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात ज्यामध्ये पहिल्या हप्त्यात 3000 रुपये आणि दुसऱ्या हप्त्यात 2000 रुपये दिले जातात. तर दुसरे मूल मुलगी असल्यास 6000 रुपये एका हप्त्यात दिले जातात.
दरम्यान, या योजनेअंतर्गत ज्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे किंवा जे बीपीएल कार्डधारक आहेत किंवा ज्या महिला अनुसूचित जाती-जमातीतील आहेत, त्यांना लाभ दिला जातो. ई-श्रम कार्ड धारण केलेल्या महिला. किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी. मनरेगा जॉब कार्डधारक महिलांनाही या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो. योजनेशी संबंधित इतर माहितीसाठी, तुम्ही https://wcd.delhi.gov.in/wcd/pradhan-mantri-matru-vandana-yojana-pmmvy ला वेबसाईटवर भेट देऊ शकता.
पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेअंतर्गत, गर्भवती महिलांना 5 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम डीबीटीद्वारे तीन हप्त्यांमध्ये थेट गर्भवती महिलेच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते.
पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेंतर्गत, गरोदर महिलेच्या बँक खात्यात 1000 रुपयांचा पहिला हप्ता हस्तांतरित केला जातो, जेव्हा ती महिला तिच्या गरोदरपणाच्या सुरुवातीला अंगणवाडी केंद्र किंवा सामुदायिक आरोग्य केंद्रात स्वतःची नोंदणी करते.
या योजनेअंतर्गत, 2000 रुपयांचा दुसरा हप्ता गरोदरपणाच्या 6 महिन्यांनंतर आणि किमान 1 प्रसूतीपूर्व तपासणीनंतर हस्तांतरित केला जातो.
पीएम मातृत्व वंदना योजनेअंतर्गत, 2000 रुपयांचा तिसरा हप्ता मुलाच्या जन्मानंतर हस्तांतरित केला जातो.
कसा कराल अर्ज?
केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेसाठी अर्ज करण्यासाठी गर्भवती महिलांना अंगणवाडी केंद्रात नोंदणी करावी लागेल. यानंतर योजनेचा फॉर्म भरून योग्य माहिती आणि संबंधित कागदपत्रांसह सादर करावा लागेल. योजनेचा फॉर्म http://wcd.nic.in या वेबसाईटवरूनही डाऊनलोड करता येईल. हा फॉर्म भरून कागदपत्रांसह अंगणवाडी केंद्रात जमा करावा लागतो.