Plane Crash In Ahmedabad : गुजरातमधील अहमदाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इथं एअर इंडियाच्या विमानाचा अपघात (Plane Crash In Ahmedabad ) झाला आहे. आज दुपारी गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले आहे. एकूण 242 प्रवाशांना घेऊन हे विमान जात होते. यावेळी ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत मोठी जिवितहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही.
समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये विमानाचा भीषण अपघात झाल्याचे दिसत आहे. विमानाला मोठा आगी लागल्याचे दिसत आहे. लोक आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या विंगजवळ उभ्या आहेत. आग विझवण्याचे काम सुरू आहे. या परिसरात गोंधळाचे वातावरण आहे.
दुर्घटनेत मोठी जिवितहानी झाल्याची शक्यता
गुजरातमधील अहमदाबाद इथे एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला असून मेघानीनगर ह्या नागरी वस्तीतच हे विमान कोसळलं. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी व प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून विमानातून तब्बल 242 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. विमान जिथे क्रॅश झालं, त्याठिकाणी धुराचे मोठे लोळ पसरल्याचं दिसून येत आहे, घटनास्थळी बचाव पथक पोहोचलं आहे. मात्र, या दुर्घटनेत मोठी जिवितहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लंडनला म्हणजे दूर मार्गावर जाणार असल्याने या विमानत इंधन देखील मोठ्या प्रमाणात भरण्यात आलं होतं, त्यामुळे अपघातानंतर दुर्घटना पेट घेतला.
दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी ह्या विमानानं लंडनच्या दिशेनं उड्डाण केलं होतं
अहमदाबाद विमानतळावरून दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी ह्या विमानानं लंडनच्या दिशेनं उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. अहमदाबाद विमानतळाबाहेरील मेघानीनगर रहिवाशी परिसरात या विमानाचा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर मेघानीनगरचे अंतर अंदाजे 15 किलोमीटर आहे, येथेच हा अपघात झाला आहे. अपघातानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. अपघातात मोठी जवीतहानी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एअर इंडियाचे Boeing Dreamliner 787 हे विमान कोसळलं असून या विमानातील प्रवासी क्षमता 300 एवढी आहे.
महत्वाच्या बातम्या: