Raja Raghuvanshi Murder Case: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मेघालय पोलिसांनी आतापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. पोलिसांनी सोनम रघुवंशीसह पाचही आरोपींना शिलाँग येथील न्यायालयात हजर केले होते. या प्रकरणात आता एक धक्कादायक अपडेट समोर आले आहे. एका अहवालानुसार, राजा रघुवंशी यांच्या हत्येमध्ये पाच नव्हे, तर सहा जणांचा सहभाग होता. पोलीस सध्या या हत्याकांडाच्या प्रत्येक कोनातून तपास करत आहेत. सध्या सहाव्या पात्रासंदर्भात मोठे गूढ कायम आहे.
पोलिसांनी सोनमसह चार आरोपींना अटक केली होती. या आरोपींमध्ये सोनमचा कथित प्रियकर राज कुशवाहाचाही समावेश आहे. मात्र आता असा दावा केला जात आहे की, या हत्याकांडात सहावा व्यक्ती देखील सामील असू शकतो. तथापि, या संदर्भात मेघालय पोलिसांकडून याबाबत कुठलीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
सोनमचा मोबाईल फोन अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मात्र, इंदौरमध्ये अटक केलेल्या एका आरोपीकडून घटनेच्या दिवशी त्याने घातलेले कपडे जप्त करण्यात आले आहेत. अद्याप आरोपींना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आलेली नाही. न्यायालयाकडून पोलीस कोठडी मिळाल्यानंतर सर्व आरोपींना समोरासमोर बसवून चौकशी केली जाईल, ज्यामुळे या प्रकरणातील मास्टरमाइंडची खरी ओळख स्पष्ट होण्यास मदत होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
सर्व आरोपी एकमेकांना ठरवताय मास्टरमाइंड
आतापर्यंत चौकशीत सर्व आरोपी एकमेकांनाच हत्याकांडाचा मास्टरमाइंड ठरवत आहेत. सोनमचं म्हणणं आहे की, राज हा मास्टरमाइंड आहे, तर राजचा दावा आहे की, सोनमच या संपूर्ण कटाची मुख्य सूत्रधार आहे. जेव्हा सर्व आरोपींना समोरासमोर बसवून चौकशी केली जाईल, तेव्हाच या प्रकरणातील खरा मास्टरमाइंड समोर येणार आहे. न्यायालयाकडून रिमांड मिळाल्यानंतर चौकशीद्वारे हत्येचा कट, योजना आणि मुख्य सूत्रधाराची ओळख पटवली जाईल.
सोनमने तिचा गुन्हा कबूल केला होता
दरम्यान, सोनमने तिचा गुन्हा कबूल केला, तिचा पती राजा रघुवंशी याच्या हत्येत तिने तिची भूमिका कबूल केली आहे. मेघालय पोलिसांनी तिचा प्रियकर राज कुशवाहा याला भेटवून चौकशी केली तेव्हा त्याने देखील आपला गुन्हा कबूल केला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या