NIA Raid : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI Case) विरोधात राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) रविवारी मोठी कारवाई केली आहे. आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) आणि तेलंगाणा (Telangana) राज्यात एनआयएनं 40 ठिकाणी छापेमारी केली आहे. यामध्ये चार झणांना ताब्यात घेतलं आहे. 


रविवारी एनआयएनं 40 वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत चार जणांना ताब्यात घेतलं आहे. राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) तेलंगणामध्ये 38 ठिकाणी (निजामाबादमध्ये 23, हैदराबादमध्ये चार, जगत्यालमध्ये सात, निर्मलमध्ये दोन, दिलाबाद आणि करीमनगर जिल्ह्यात एक एक ठिकाणी छापेमारी) आणि आंध्र प्रदेशमध्ये दोन ठिकाणी (कुरनूल आणि नेल्लोर जिल्ह्यात एक एक ठिकाणी) छापेमारी केली आहे. 






राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) दोन राज्यातील छापेमारीबाबत रविवारी माहिती दिली. एनआयएने सांगितलं की, 'या छापेमारीत काही डिजिटल साहित्य जप्त करण्यात आली आहेत. त्याशिवा महत्वाची कागदपत्रे, दोन खंजीर आणि रोख 8,31,500 रुपये जप्त करण्यात आलेय. त्याच प्रमाणे छापेमारीत काही आपत्तिजनक साहित्यही जप्त करण्यात आले आहे. ' छापेमारीदरम्यान चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे, असेही एनआयएनं माहिती दिली.  ताब्यात घेण्यात आलेले चारही आरोपी दहशतवादी कृत्य करण्यासाठी आणि धर्माच्या आधारावर लोकांमध्ये वाद वाढावा, यासाठी शिबिरांचं आयोजन करत होते, असेही एनआयएने सांगितलं.  






तपासादरम्यान, तेलंगणाच्या निजामाबाद पोलिस स्टेशनच्या मदतीनं चार जणांना ताब्यात घेतलं होतं. या चार आरोपीमध्ये अब्दुल कादर, शेख सहदुल्ला, मोहम्मद इमरान आणि मोहम्मद अब्दुल मोबिन यांचा समावेश होता. त्यानंतर 26 ऑगस्ट रोजी एनआयनं त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, एनआयएच्या विशेष पथकानं निजामाबादमधील एपीएचबी कॉलोनीत शहीद चौश उर्फ ​​शाहिद यांच्या घरी छापेमारी करण्यात आली. शाहिद यांना 41 (ए) भादवि नुसार नोटीस देण्यात आली होती. कायदेशीर जागृतीच्या नावाखाली या ठिकाणी पीएफआय उपक्रमांसाठी कराटे प्रशिक्षण आयोजित करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यांना जातीय हिंसा भडकवायची होती, असाur आरोपही करण्यात आला.