Provident Fund : दिवाळीच्या तोंडावर कर्मचारी भविष्य निधी संघटनेची (EPFO) खातेधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या आर्थिक वर्षातील पीएफ (Provident Fund) वर 8.5 टक्के व्याज दर देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय कामगार मंत्री अध्यक्ष असेलेल्या बोर्डने हा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाचा फायदा पाच कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. 

Continues below advertisement


EPFO ने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 8.5 टक्के व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. हा व्याजदर गेल्या सात वर्षांतील सर्वात कमी आहे. गेल्या आर्थिक वर्षासाठी व्याज दर समान होता. 2019 मध्ये 8.65 टक्के व्याज ईपीएफवर मिळत होतं. त्याचप्रमाणे पूर्वी 2018 मध्ये 8.55 टक्के व्याज देण्यात आलं होतं. यानुसार मागील आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये, केवायसीमध्ये अडथळा आल्यामुळे, अनेक लोकांना व्याज मिळवण्यासाठी 8-10 महिन्यांची दीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती.


तुम्ही ज्या संस्थेत काम करता त्या संस्थेच्या वतीने दरमहा EPFO खात्यात पैसे हस्तांतरित केले जातात. ही एक निश्चित रक्कम असते, जी तुमच्या पगारातून कापली जाते आणि पीएफ खात्यात जमा केली जाते. तुमची संस्था देखील या खात्यात समान रक्कम योगदान देते त्याला पीएफ म्हटलं जातं. 


वैयक्तिक माहिती शेअर करु नका
EPFO खातेधारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. जर आपले  PF Account असेल तर त्या संबंधी कोणतीही महत्वाची माहिती कुणाशीही शेअर करु नका असं आवाहन EPFO च्या वतीनं करण्यात आलं आहे. एखादी महत्वाची माहिती, किंवा आधार नंबर, पॅन नंबर, यूएन अकाऊंट डिटेल्स, ओटीपी अशी कोणी मागणी केल्यास ती देऊ नये अन्यथा तुमच्या अकाऊंटमधील सर्व पैसे गायब होण्याची शक्यता आहे असं EPFO ने म्हटलं आहे. 


EPFO त्यांच्या ऑफिशिअल ट्विटर हॅन्डलवर या संबंधी एका ट्वीटच्या माध्यमातून आवाहन केलं आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, आधार नंबर, पॅन नंबर, बँक डिटेल्स, बँक अकाऊंट डीटेल्स आणि ओटीपी या संबंधी माहिती EPFO कडून कधीही मागण्यात येत नाही. तशा प्रकारचा कोणताही कॉल केला जात नाही. जर अशा प्रकारचा कोणताही कॉल आला तर सावध रहावं आणि कोणतीही डीटेल्स शेअर करु नये. 


महत्वाच्या बातम्या :