EPFO UAN AADHAR LINK : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने EPF सदस्यांना मोठा दिलासा दिला आहे. ईपीएफ अकाउंट आधार कार्डाला लिंक करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. आता सदस्य 31 डिसेंबर 2021 पर्यंत UAN आधारशी लिंक करता येणार आहे. EPFO च्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, यापूर्वी शेवटची तारिख 31 ऑगस्ट देण्यात आली होती. 


EPFO सदस्यांना त्यांचं EPF खातं आधारशी लिंक करणं बंधनकारक आहे. सामाजिक सुरक्षा संहिता 2020 अंतर्गत असणाऱ्या EPFO नं आधार लिंक करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता सर्व खातेधारकांचा UAN व्हेरिफाय असणं अत्यंत आवश्यक आहे.


जर तुम्ही तुमचं EPFO खातं 31 डिसेंबरपर्यंत आधारशी लिंक केलं नाही, तर कंपनीच्या वतीनं तुमच्या खात्यात जमा होणारा पीएफ थांबवला जाईल. या व्यतिरिक्त, खात्यात जमा पैसे काढण्यासाठी देखील अडचणी निर्माण होतील. असं होऊ नये यासाठी तुम्ही त्वरित EPFO च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन, तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्या. त्यामुळे तुम्हाला भविष्यात येणाऱ्या खात्याशी संबंधित कोणत्याही अडचणींना सामोरं जावं लागणार नाही.



EPFO खातं आधार कार्डाशी कसं लिंक कराल?


1. सर्वात आधी EPFO ची अधिकृत वेबसाईट epfindia.gov.in ला भेट द्या. आपलं अकाउंट लॉग इन करा.
2. त्यानंतर 'ऑनलाइन सेवा' पर्याय क्लिक करा. नंतर  'ई-केवायसी पोर्टल' वर जाऊन, Link UAN Aadhaar या पर्यायावर क्लिक करा.
3. तिथे तुमचा UAN क्रमांक आणि रजिस्टर मोबाईल नंबर प्रविष्ट करा.
4. मोबाईल नंबर तिथे प्रविष्ट केल्यानंतर त्या नंबरवर  OTP येईल. तिथे ओटीपी आणि  आधार नंबर तिथे टाका.
5. यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा आणि ओटीपी व्हेरिफिकेशन करून घेऊन आपला मोबाईल नंबर रजिस्टर करून घ्या. .
6. यानंतर, EPFO कडून आधार-ईपीएफ अकाउंट लिंकिंग ऑथन्टिकेशनसाठी तुम्ही काम करत असलेल्या कंपनीशी संपर्क साधला जाईल. तुमच्या कंपनीकडून आधारला ईपीएफ अकाउंटशी जोडण्यासाठी व्हेरिफिकेशन मिळाल्यानंतर अकाउंट आधार कार्डाशी जोडलं जाईल
7. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचं EPFO खातं आधारशी लिंक केलं जाईल.