गांधीनगर : नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकलं, मात्र त्याचा फायदा गुजरातमधील अनेकांना झाला. भालाफेकीत नीरजने ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला. आता त्याच्या नावाच्या लोकांना याचा लाभ मिळत आहेत. गुजरातच्या भरूच जिल्ह्यातील नेत्रंग या छोट्या शहराच्या एका पेट्रोल पंपाच्या मालकाने एका वेगळ्या पद्धतीने ऑलिम्पिकमध्ये नीरजने सुवर्ण जिंकल्याचा आनंद साजरा करण्याचा निर्णय घेतला.
या पेट्रोल पंप मालकाने रविवारी त्याच्या पंपावर एक बोर्ड लावला की, नीरज नावाच्या प्रत्येक व्यक्तीला दोन दिवस म्हणजे सोमवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 501 रुपयांचे मोफत पेट्रोल मिळेल. एसपी पेट्रोलियमचे मालक आयुब पठाण यांनी सांगितले की, ही ऑफर नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीच्या सन्मानार्थ देण्यात आली आहे. नीरज नावाच्या प्रत्येक व्यक्तीला आपले ओळखपत्र दाखवून मोफत पेट्रोल मिळत आहे. एवढेच नाही तर मालकाने त्याच्या पंपावर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना या नावाने फिलिंग स्टेशनवर सर्वांचे मनापासून स्वागत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
टोकिया ऑलिम्पिकमध्ये नीरजनं 87.88 मीटर भाला फेकत ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तब्बल 13 वर्षानंतर म्हणजे 2008 बीजिंग ऑलिम्पिकनंतरचं हे पहिलं सुवर्ण पदक आहे. तर वैयक्तिक भारतासाठी केवळ दुसरं सुवर्ण पदक आहे.
इन्स्टाग्रामचे 24 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स
नीरजने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यापूर्वी, इन्स्टाग्रामवर सुमारे 1 दशलक्ष (10 लाख) फॉलोअर्स होते, जे शनिवारपासून वाढून 2.5 दशलक्ष (25 लाख) झाले आहेत. याशिवाय 5.50 लाखांहून अधिक लोकांनी त्याच्या पदकासह पोस्ट केलेले फोटो लाईक केले आहेत आणि हजारो लोकांनी कमेंट करून त्याचे अभिनंदन केले आहे. तो अनेकदा त्याचे फोटो आणि व्हिडिओ इन्स्टावर शेअर करतो.
इतर बातम्या