मुंबई : देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती गेल्या दहा दिवसांपासून सलग वाढत आहेत. बरेच दिवसांपासून असा अंदाज वर्तविला जात आहे की पेट्रोलचे दर शंभरी गाठतील. आज अनेक ठिकाणी पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये आज पेट्रोल 100.07 रुपयांवर पोहोचले आहे.


देशातील पेट्रोलची वाढती किंमत शेजारील पाकिस्तानपेक्षा खूपच पुढे गेली आहे. पाकिस्तानमध्ये भारताच्या निम्म्या किंमतीत पेट्रोल उपलब्ध आहे. पाकिस्तानात ग्राहकांना पेट्रोल प्रतिलिटर 51.14 रुपये दराने मिळत आहे. त्याचबरोबर चीनमध्ये पेट्रोलची किंमत प्रतिलिटर. 74.74 रुपये आहे.


सर्वाधिक स्वस्त पेट्रोल कुठे मिळतं?


भारतात पेट्रोलचे दर नवीन विक्रम नोंदवत असताना काही देशांमध्येही पेट्रोलची किंमत इतकी कमी आहे की आपण विचारही करु शकत नाही. व्हेनेझुएलामध्ये पेट्रोल 1.45 रुपये प्रतिलिटर दराने विकलं जात आहे. इराणमध्ये पेट्रोलचे दर 4.50 रुपये प्रतिलिटर आहे. यासह अंगोलामध्ये पेट्रोलची किंमत 17.82 रुपये, अल्जीरियामध्ये 25.15 रुपये आणि कुवेतमध्ये 25.26 रुपये प्रतिलिटर आहे.


Petrol Diesel Price : पेट्रोल डिझेलच्या दरात सलग दहाव्या दिवशी वाढ


भारताच्या शेजारच्या देशांमध्ये पेट्रोलची किंमत


भारताच्या शेजारच्या देशांमध्ये भूतानमध्ये पेट्रोल 49.56 रुपये, पाकिस्तानात 51.14 रुपये, श्रीलंकेत 60.26 रुपये, नेपाळमध्ये 68.98 रुपये, बांग्लादेशात 76.41 रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध आहे.



Petrol Diesel Price Hike : इंधनाचे दर वाढतायेत तसं लोकांचं उत्पन्नही वाढत आहे, भाजप खासदाराचं अजब वक्तव्य


भारतात महत्वाच्या शहरातील इंधनाचे दर




  • मुंबई - पेट्रोल 96.32 रुपये, डिझेल 87.32 रुपये

  • दिल्ली - पेट्रोल 89.88 रुपये, डिझेल 80.27 रुपये

  • चेन्नई - पेट्रोल 91.98 रुपये, डिझेल 85.31रुपये

  • कोलकाता - पेट्रोल 91.11 रुपये, डिझेल 83.86 रुपये


Special Report : इंधन दरवाढीचा कशा कशावर परिणाम होतो? 

इंधनाचे दर कुठे पाहता येतील? 

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. नवे दर हे सकाळी 6 पासूनच लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमत एसएमएसद्वारे देखील कळू शकते. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड आयओसीएलच्या वेबसाईटवर मिळेल.