नवी दिल्ली: पेट्रोलच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. तर डिझेलच्या किंमतीत मात्र अंशत: घट झाली आहे. पेट्रोल 28 (वॅट वगळून) पैशांनी महागलं असून डिझेल सहा पैशांनी स्वस्त झालं आहे.


आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किंमती लक्षात घेऊन तेल कंपन्यानी हा निर्णय घेतला आहे. मागील दोन महिन्यात तिसऱ्यांदा पेट्रोलच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे तर डिझेलच्या किंमतीत दोनदा घट करण्यात आली आहे. दरम्यान नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.

याआधी 16 सप्टेंबरला पेट्रोलचे दर 58 पैशांनी महागले होते. तर डिझेलच्या दरात 31 पैशांनी घट करण्यात आली होती. 28 पैशांची वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल सध्या 70 रुपयांच्या आसपास पोहचलं असून आता यामध्ये आता 28 पैशांची वाढ करण्यात आली आहे.