Petrol-Diesel 8 July : देशात इंधन दरवाढीचं सत्र सुरु असून आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी शनिवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोल आज 35 पैशांनी तर डिझेल 26 पैशांनी महागलं आहे. राजधानी दिल्लीमध्ये इंडियन ऑइलच्या पंपावर पेट्रोल 100.91 रुपये प्रति लिटरनं तर डिझेल 89.88 रुपये प्रति लिटरने विकण्यात येत आहे. तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोलची किंमत आता 106.59 रुपयांवर गेली आहे. देशातील सर्वच मोठ्या शहरांमध्ये पेट्रोलची किंमत शंभरी पार पोहोचली आहे.   


कोलाकातामध्ये पेट्रोलची किंमत 100.23 रुपये प्रति लिटर वरुन 100.62 रुपये प्रति लिटर झाली आहे. चेन्नई आणि मुंबई मध्ये पेट्रोलच्या किमतीनं यापूर्वीच शंभरी ओलांडली आहे. मुंबईत 29 मे रोजी पेट्रोलनं शंभरीचा आकडा पार केला आहे. मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत आता 106.59 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे.


राष्ट्रीय राजधानीत 1 मे ला 90.40 रुपये प्रति लिटर पेट्रोलची किंमत होती. तर आता राजधानीत पेट्रोलची किंमत 100.91 रुपये प्रतिलिटरवर गेली आहे. गेल्या दोन महिन्यांत पेट्रोलच्या किंमतीत तब्बल 10.51 रुपयांची वाढ झाली आहे तर डिझेलच्या दरातही प्रतिलिटर 9.15 रुपयांची वाढ झाली आहे.


इतर शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती : 



  1. मुंबईत आज पेट्रोल 106.92 रुपये आणि डिझेल 97.46 रुपये प्रति लिटर

  2. चेन्नईत आज पेट्रोल 101.67 रुपये आणि डिझेल 94.39 रुपये प्रति लिटर

  3. कोलकाता मध्ये आज पेट्रोल 101.01 रुपये आणि डिझेल 92.97 रुपये प्रति लिटर

  4. बंगळुरुत आज पेट्रोल 104.29 रुपये आणि डिझेल 95.26 रुपये प्रति लिटर

  5. भोपाळमध्ये आज पेट्रोल 109.24 रुपये आणि डिझेल 98.67 रुपये प्रति लिटर

  6. पाटनामध्ये आज पेट्रोल 103.18 रुपये आणि डिझेल 95.46 रुपये प्रति लिटर

  7. चंदीगढमध्ये आज पेट्रोल 97.04 रुपये आणि डिझेल 89.51 रुपये प्रति लिटर

  8. लखनौमध्ये आज पेट्रोल 98.01 रुपये आणि डिझेल 90.27 रुपये प्रति लिटर

  9. रांचीत आज पेट्रोल 95.96 रुपये आणि डिझेल 94.84 रुपये प्रति लिटर


या राज्यांत पेट्रोलची शंभरी


दिल्ली, पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, ओडिशा, तामिळनाडू, केरळ, बिहार, पंजाब, लडाख आणि सिक्कीम येथे पेट्रोलच्या किंमतींनी शंभरी ओलांडली आहे. तर राजस्थान, ओडिशा, मध्य प्रदेशसारख्या काही राज्यांत डिझेलने प्रतिलिटर शंभपी पार केली आहे.


वैश्विक स्तरावर कच्च्या तेलाची किंमत आता 75 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास पोहोचली आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये ही 80 रुपये प्रति बॅरलहून अधिक होती. परंतु, तरिही देशात पेट्रोलची किंमत जवळपास 80 रुपये प्रति लिटरच्या आसपास होती. परंतु, आता तेलाची किंमत कमी असूनही पेट्रोलची किंमत शंभरीपार पोहोचली आहे. 


पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?


इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx  पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).