Petrol Price Today, Diesel Rate Latest Updates 3rd Saptembar, 2021 : देशात पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये 3 सप्टेंबर 2021 रोजी म्हणजेच, शुक्रवारी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आजचा सलग दुसरा दिवस आहे, आज सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणतेही बदल केलेले नाहीत. 1 सप्टेंबर, 2021 रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरांत 13 ते 15 पैशांची घट करण्यात आली होती. परंतु, त्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नाही. देशात ऑगस्ट महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये काही प्रमाणात घट करण्यात आली होती. त्यामुळे इंधनदरवाढीमुळं त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. दरम्यान, देशातील मोठ्या शहरांमध्ये पेट्रोलच्या किमती 100 रुपये प्रती लिटर इतक्या आहेत. 

देशाच्या महत्त्वाच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर : 

शहरं 

पेट्रोलच्या किमती

डिझेलच्या किमती 
मुंबई 107.52 रुपये प्रति लिटर 96.48 रुपये प्रति लिटर
दिल्ली 101.34 रुपये प्रति लिटर 88.77 रुपये प्रति लिटर
कोलकाता 101.72 रुपये प्रति लिटर 91.84 रुपये प्रति लिटर
चेन्नई 99.08 रुपये प्रति लिटर 93.38 रुपये प्रति लिटर
बंगळुरु  104.84 रुपये प्रति लिटर 94.19 रुपये प्रति लिटर
भोपाळ 109.91 रुपये प्रति लिटर 97.72 रुपये प्रति लिटर
लखनौ 98.43 रुपये प्रति लिटर 89.15 रुपये प्रति लिटर
पाटना 103.89 रुपये प्रति लिटर 94.65 रुपये प्रति लिटर
चंदीगढ 97.53 रुपये प्रति लिटर 86.48 रुपये प्रति लिटर

जुलै महिन्यातील वाढ

जुलै महिन्यात आतापर्यंत पेट्रोलच्या किमती 9 वेळा आणि डिझेलच्या किमतींमध्ये 5 वेळा वाढ झाली आहे. तसेच जुलै महिन्यात एका दिवशी डिझेलच्या किमतीत काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यापूर्वी मे आणि जून महिन्यात इंधनाच्या किमतींमध्ये 16-16 वेळा वाढ झाली होती. 4 मेनंतर आतापर्यंत राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 11.44 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 09.14 रुपये प्रति लिटर महाग झालं आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).