Petrol-Diesel Price Today on 24 April 2022 : आज सलग 19व्या दिवशी देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती (Petrol Diesel price today) स्थिर आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत.  देशभरात 7 एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOCL) च्या लेटेस्ट दरांनुसार, आज देशातील सर्व शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.  

पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ने जारी केलेल्या नव्या दरांनुसार, देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत पेट्रोलचे दर सध्या 120.51 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. तर डिझेल 104.77 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. तर देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीमध्ये पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर डिझेल 96.67 रुपये प्रति लिटरनं विकलं जातं आहे. 

इंडियन ऑईलनं जारी केलेल्या किमतींनुसार, पोर्टब्लेयरमध्ये पेट्रोलची किंमत 91.45 रुपये प्रति लिटर आहे. तर महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोल 123.47 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 105.41 रुपये आहे. तेल कंपन्यांनी 22 मार्च नंतर सलग 14 वेळा दरवाढ केली होती. गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल 10.20 रुपयांनी महाग झालं होतं. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचं सत्र सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चं तेल 106 डॉलरच्या (Crude Oil price) पातळीवर बंद झालं. येथे 21 एप्रिल रोजी भारतीय बास्केटसाठी कच्च्या तेलाची सरासरी किंमत 106.14 डॉलर होती. 20 एप्रिल रोजी सरासरी किंमत प्रति बॅरल 105.51 डॉलर होती. ही माहिती PPAC च्या वतीनं देण्यात आली होती. 11 एप्रिल रोजी किंमत प्रति बॅरल 97.82 डॉलर होती. अशाप्रकारे, गेल्या दहा दिवसांत क्रूड बास्केटची किंमत 8.32 डॉलरने वाढली आहे. सरासरी किंमतीतील ही वाढ सातत्यानं सुरू आहे. परंतु, तेल कंपन्यांनी 6 एप्रिलपासून दरांत कोणताही बदल केलेला नाही.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीमुळे 4 नोव्हेंबर 2021 पासून 21 मार्च 2022 पर्यंत देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते. साडेचार महिन्यांनी किमतींमध्ये बदल झाला होता. 6 एप्रिलपर्यंत पेट्रोल 10 रुपये प्रति लिटर महाग झालं आहे. त्यानंतर गेले एकोणवीस दिवस पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. 

सरकार उत्पादन शुल्कात कपात करणार नाही

पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले की, केंद्र सरकारनं उत्पादन शुल्कात आधीच कपात केली आहे. आता राज्य सरकाराची वेळ असून त्यांनी व्हॅटमध्ये कपात करावी. याच्या मदतीनं ते आपल्या राज्यातील जनतेला दिलासा देऊ शकतात. पुरी यांच्या वक्तव्यानंतर केंद्र सरकार उत्पादन शुल्कात पुन्हा कपात करू शकते, अशी बातमी समोर आली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. 

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्यांतील पेट्रोल-डिझेलचे दर

शहरं पेट्रोलचे दर (प्रति लिटर) डिझेलचे दर (प्रति लिटर)
मुंबई 120.51 रुपये 104.77 रुपये
पुणे 120.60 रुपये 103.28 रुपये
नाशिक 120.02 रुपये  102.73 रुपये 
परभणी 123.51 रुपये 106.08 रुपये
औरंगाबाद  120.63 रुपये  103.32 रुपये 
कोल्हापूर 120.64 रुपये 103.35 रुपये
नागपूर  121.03 रुपये 103.73 रुपये

देशातील महत्त्वाच्या शहरांचे दर काय? 

शहरं  पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर) डिझेलच्या किमती (प्रति लिटर)
मुंबई 120.51 104.77 
दिल्ली 105.41  96.67
चेन्नई 110.85 100.94 
कोलकाता  115.12 99.83
हैद्राबाद 119.49  105.49 
कोलकाता 115.12  96.83
बंगळुरू  111.09  94.79 

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).