Petrol Diesel Price Today : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. आज कच्च्या तेलात विक्रमी वाढ होऊनही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. आजही इंधनाच्या किमती स्थिर आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून युद्ध सुरू असून, त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींवरही झाला आहे. 


भारतीय पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या ताज्या माहितीनुसार, आज मुंबईत एक लिटर पेट्रोल दर 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपयांना विकलं जात आहे. दिल्लीत पेट्रोलची किंमत 95.41 रुपये प्रति लिटर आहे, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लीटर आहे. याशिवाय, कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 104.67 रुपयांवर आणि डिझेलचे दर 89.79 रुपयांवर स्थिर आहेत. चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.


नोएडामध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झालेला नाही. नोएडामध्ये पेट्रोल 95.51 रुपये, डिझेल 87.01 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. लखनौमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 95.28 रुपये आहे, तर डिझेल 86.80 रुपये दराने उपलब्ध आहे. याशिवाय बंगळुरूमध्ये पेट्रोलचा दर 100.58 रुपये तर डिझेलचा दर 85.01 रुपये आहे. 


दरम्यान, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकींच्या सर्व टप्प्यातील मतदान संपलं. त्यामुळे आज देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये मोठी वाढ होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. मात्र लवकरच इंधन दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवल जात आहे.



  • प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर


दिल्ली


पेट्रोल - 95.41 रुपये प्रति लिटर


डिझेल - 86.67 रुपये प्रति लिटर


मुंबई


पेट्रोल - 109.98 रुपये प्रति लिटर


डिझेल - 94.14 रुपये प्रति लिटर


कोलकाता


पेट्रोल - 104.67 रुपये प्रति लिटर


डिझेल - 89.79 रुपये प्रति लिटर


चेन्नई


पेट्रोल - 101.40 रुपये प्रति लिटर


डिझेल - 91.43 रुपये प्रति लिटर


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha