Petrol-Diesel Price Today 9th May 2022 : घरगुती बाजारात ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी (Oil marketing companies) आज सलग 33व्या दिवशी पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel prices) च्या दरांत कोणताही बदल केलेला नाही. ग्लोबल मार्केटमध्ये कच्च तेल महाग होत आहे. त्यानंतरही पेट्रोल (Petrol Price) -डिझेलचे दर (Diesel Price) स्थिर आहेत. सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरीदेखील पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात 6 एप्रिल रोजी तेलाच्या किमतीत 80-80 पैशांनी वाढ झाली होती. तेव्हापासून इंधन दर वाढलेले नाहीत. 

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत शेवटचा बदल 6 एप्रिल 2022 रोजी झाला होता. त्या बदलानंतर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेल 80 पैशांनी महागलं होतं. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होऊनही भारतातील किंमती स्थिर आहेत. पाच राज्यांतील निवडणूक निकाल जाहीर होण्यापूर्वी अनेक महिने तेलाच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्या होत्या. मात्र 22 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे 10 रुपयांनी वाढ झाली आहे.

देशाच्या राजधानीत आणि आर्थिक राजधानीत पेट्रोल-डिझेलचे दर काय? 

देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. विशेष म्हणजे, पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असल्याचा आजचा 32 वा दिवस आहे. रविवारी दिल्लीत 1 लिटर पेट्रोलची किंमत 105.41 रुपये आणि 1 लिटर डिझेलची किंमत 96.67 रुपये आहे. तर, देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी 120.51 रुपये, तर एक लिटर डिझेलसाठी 104.77 रुपये मोजावे लागत आहेत. 

इंडियन ऑईलनं जारी केलेल्या किमतींनुसार, पोर्टब्लेयरमध्ये पेट्रोलची किंमत 91.45 रुपये प्रति लिटर आहे. तर महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोल 123.47 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 105.41 रुपये आहे. तेल कंपन्यांनी 22 मार्च नंतर सलग 14 वेळा दरवाढ केली होती. गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल 10.20 रुपयांनी महाग झालं होतं. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचं सत्र सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

देशातील महत्त्वाच्या शहरांचे दर काय? 

शहरं  पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर) डिझेलच्या किमती (प्रति लिटर)
मुंबई 120.51 104.77 
दिल्ली 105.41  96.67
चेन्नई 110.85 100.94 
कोलकाता  115.12 99.83
हैद्राबाद 119.49  105.49 
कोलकाता 115.12  96.83
बंगळुरू  111.09  94.79 

दररोज बदलतात पेट्रोल-डिझेलच्या किमती 

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज बदलली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींची माहिती अपडेट करतात. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).