KCR National Party : 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) त्यांच्या नवीन पक्षाची घोषणा केली. त्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्याचे जाहीर केले. त्यांनी बुधुवारी (5 ऑक्टोबर) त्यांच्या भारत राष्ट्र समिती (BRS) या नवीन पक्षाची घोषणा केली आहे. त्यानंतर के. चंद्रशेखर राव यांनी देशभर यात्रा काढणार असल्याची घोषणा देखील केली आहे. या यात्रेची सुरुवात महाराष्ट्रातून (Maharashtra) करणार असल्याची माहिती के. चंद्रशेखर राव यांनी दिली आहे.
 
बुधुवारी के चंदर्शेखर राव यांनी पक्षांच्या नेत्यांची महत्तवपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत देशभर यात्रा करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची सुरुवात महाराष्ट्रातून केली जाणार आहे. भारत राष्ट्र समितीशी संलग्न असलेल्या शेतकरी संघाची सुरुवात महाराष्ट्रातून केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पक्षाच्या कार्याचे पहिले क्षेत्र म्हणून महाराष्ट्राची निवड केली जाईल. राष्ट्रीय पक्षाशी संलग्न असलेल्या किसान संघाची सुरुवात प्रथम महाराष्ट्रातून होणार आहे.


के. चंद्रशेखर राव यांच्या राष्ट्रीय पक्षाचा अजेंडा काय?


जनतेच्या समस्या हाच आपल्या राष्ट्रीय पक्षाचा अजेंडा असल्याचे के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले आहे. शेतकरी, दलित, सर्वसामा्य जनतेचे प्रश्न आपण ठळकपणे मांडणार आहोत असे ते म्हणाले. दरम्यान, काल झालेल्या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव उपस्थित राहण्यास तयार होते, परंतू ते पक्षाच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी येणार असल्याचे के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले.
देशाचा जसा विकास व्हायला हवा होता तसा झालेला नाही. देशवासीयांच्या कल्याणासाठी आणि समृद्धीसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले. आपल्या पक्षाच्या सत्ताकाळात गेल्या आठ वर्षातील कामगिरीचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला. 


विरोधकांची मोट बांधण्याचा  के. चंद्रशेखर राव यांचा प्रयत्न


तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांनी भारत राष्ट्र समिती या पक्षाची घोषणा केली आहे. यावेळी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी यावेळी हजेरी लावली होती. मागील 21 वर्षांपासून केसीआर तेलंगणा राष्ट्र समितीच्या माध्यमातून तेलंगणा राज्याच्या राजकारणात सक्रीय आहेत. मागील काही दिवसांपासून भाजपविरोधात विरोधक एकवटत असल्याचे दिसत आहे. यामध्ये केसीआर यांचं नाव आघाडीवर आहे. केसीआर यांनीही भाजपच्या विरोधात आवाज उठवला होता. त्यांनी दिल्लीमध्ये विरोधकांच्या भेटी घेत सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन केले होते. दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केसीआर हे विरोधकांची मोट बांदण्याचा प्रयत्न करत आहेत.


महत्त्वाच्या बातम्या:


KCR National Party : दु. 1.19 वाजता भारत राष्ट्र समितीच्या स्थापनेची घोषणा, तेलंगणाचे मुख्यमंत्री K चंद्रशेखर राव यांचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश