Jammu Kashmir Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा (Pulwama) येथे दहशतवाद्यांनी बिहारच्या मजुरांवर हल्ला केला आहे. पुलवामाच्या गदूरा भागात दहशतवाद्यांनी मजुरांवर ग्रेनेड फेकले आहे. या दहशतवादी घटनेत एक मजूर ठार झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांनी ही माहिती दिली. पोलिसांनी सध्या परिसरात नाकेबंदी केली आहे.


स्थानिक नसलेल्या कामगारांवर हल्ले वाढले


मोहम्मद मुमताज असे मृत मजुराचे नाव असून तो बिहारमधील साकवा परसा येथील रहिवासी आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, मोहम्मद आरिफ आणि मोहम्मद मजबूल अशी जखमींची नावे असून, दोघेही बिहारमधील रामपूरचे रहिवासी आहेत, दोघांची प्रकृती स्थिर आहे. या वर्षाच्या सुरुवातीला दहशतवाद्यांनी स्थानिक नसलेल्या कामगारांवर हल्ले वाढवले ​​होते, पण गेल्या दोन महिन्यांपासून अशा टार्गेट किलिंगच्या घटना कमी झाल्या होत्या.


तीन दिवसांत दहशतवाद्यांचा हा तिसरा हल्ला


तीन दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा हा तिसरा हल्ला आहे. मात्र, यापूर्वी झालेल्या हल्ल्यांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. यापूर्वी, दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील आलोचीबाग भागात पोलीस दलावरही हल्ला केला होता, परंतु नंतर ते पळून गेले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. 


पोलिस चौकीवर ग्रेनेड फेकण्यात आले


मंगळवारीही जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पोलीस चौकीवर ग्रेनेड फेकले. हा ग्रेनेड पोलीस चौकीच्या छतावर पडला आणि त्याचा स्फोट झाला. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. रामबन जिल्ह्यातील हल्ल्याबाबत अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंह यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीर गझनवी फोर्सने (JKGF) हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. स्पेशल ऑपरेशन ग्रुप (SOG) आणि लष्कराच्या पक्षांनी परिसराची नाकेबंदी करून शोध मोहीम सुरू केली आहे. जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Jalgaon : ऑडीटर साहेबांनी चक्क अंतर्वस्त्रावर केले ग्रामपंचायतीचे लेखापरीक्षण! जिल्हयात खळबळ, फोटो सोशल मीडीयावर व्हायरल


Todays Headline 5th August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या