Petrol Diesel Price Today 29 June 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Price) जाहीर केले आहेत. एकिकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे रुपयाच्या तुलनेत डॉलरनं उसळी घेतली आहे. अशातच पेट्रोल (Petrol Price) -डिझेलच्या दरांत (Diesel Price) मात्र सलग 41व्या दिवशी सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आज भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणतीही वाढ केलेली नाही. दरम्यान, देशात सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेयरमध्ये मिळतंय. पोर्ट ब्लेयरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये लिटर आहे. तर डिझेल 79.74 रुपये लिटर विकलं जात आहे. 


मे महिन्यात केंद्र सरकारनं इंधनाच्या किमतीतून उत्पादन शुल्क कमी केलं होतं. त्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले. मे महिन्यात म्हणजेच, 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत बदल झाला होता. तेव्हापासून देशातील पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. 


कच्च्या तेलाच्या किमती वधारल्या


आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती आज वाढल्याचं पाहायला मिळत आहे. WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल 112.5 डॉलर इतकी आहे. तर बेंचमार्क ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 118.6 डॉलर इतकी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळत आहे. 


देशातील महानगरांतील दर


देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देखील पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोलचा दर 111.35 रुपये तर डिझेलचा दर 97.28 रुपये प्रतिलिटर आहे. तर देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीतही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. राजधानी असलेल्या दिल्लीत 1 लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि 1 लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोलची किंमत 106.03 रुपये आहे तर डिझेलची किंमत 92.76 रुपये प्रति लीटर आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्येही पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.


महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांतील दर काय? 


महाराष्ट्रातील मुंबई शहरात गुरुवारी पेट्रोलचा दर 111.35 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 97.28 रुपये प्रति लिटर आहे. तसेच, बृहन्मुंबईमध्ये, पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.53 रुपये आणि डिझेलचा दर 97.45 रुपये प्रति लिटर आहे. आज पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.93 रुपये तर डिझेलचा दर 96.38 रुपये प्रति लिटर आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 111.25 रुपये तर डिझेलचा दर 95.73 रुपये प्रति लिटर आहे. नागपुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.41 रुपये तर डिझेलचा दर 95.92 रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.02 रुपये तर डिझेलचा दर 95.54 रुपये प्रति लिटर आहे.


पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?


इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).