Petrol-Diesel Price Today 25th August 2022 : संपूर्ण देशभरात सर्वोच्च पातळीवर असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आणले आहेत. अशातच सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की, पेट्रोल-डिझेलच्या किमती (Petrol-Diesel Price) कमी कधी होणार? तब्बल 95 दिवसांपासून महाराष्ट्र वगळता देशातील पेट्रोल (Petrol) -डिझेलच्या (Diesel) किमती स्थिर आहेत. तर राज्यात गेल्या 42 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ अथवा घट करण्यात आलेली नाही. काही दिवसांपूर्वी रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती आभाळाला भिडल्या होत्या. तेव्हापासून कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सातत्यानं चढ-उतार पाहायला मिळत आहे. पण तरिही देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घट पाहायला मिळाली होती. ब्रेंट क्रूड ऑईल 100 डॉलर्सच्या खाली आलं होतं. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये दिलासा मिळण्याची अपेक्षा सर्वसामान्यांना होती. पण तेव्हाही दर स्थिर होते. आता कच्च्या तेलानं पुन्हा 100 डॉलर प्रति बॅरल पार केलं आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमती स्वस्त होण्याच्या आशा मावळल्या आहेत.
कच्च्या तेलाचे आजचे दर
कच्च्या तेलानं काल (बुधवारी) 100 डॉलरचा टप्पा ओलांडला होता आणि आज पुन्हा त्यात वाढ होत आहे. WTI क्रूड प्रति बॅरल 95.60 डॉलरवर पोहोचलं आहे. तर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 101.97 डॉलरवर आहे.
केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारकडून पेट्रोल-डिझेलच्या किमतींत घट
22 मे रोजी केंद्र सरकारनं पेट्रोल (Petrol) -डिझेलच्या (Diesel) दरांवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. तेव्हापासून देशात पेट्रोल 9.50 रुपये आणि डिझेल 7 रुपये प्रति लिटरनं स्वस्त झालं आहे. आज सलग 94व्या दिवशी देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. राज्यात सत्तापालट झाल्यानंतर नवनिर्वाचित शिंदे-फडणवीस सरकारनं 14 जुलै रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये अनुक्रमे 5 रुपये आणि 3 रुपयांची कपात केली होती. तेव्हापासून राज्यातही पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. राज्यात गेल्या 41 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. असं असलं तरीही देशासह राज्यांत अनेक शहरांत पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे.
आजचे दर काय?
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या अधिकृत वेबसाइट iocl.com नं जारी केलेल्या दरांनुसार, आज देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ अथवा घट केलेली नाही. नव्या पेट्रोल-डिझेलच्या दरांनुसार, आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. तर देशातील राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे.
महाराष्ट्रातील इतर शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर
शहर | पेट्रोलच्या किमती | डिझेलच्या किमती |
मुंबई | 106.25 | 94.22 |
पुणे | 105 | 92 |
नागपूर | 106.03 | 92.58 |
नाशिक | 106.74 | 93.23 |
हिंगोली | 107.29 | 93.80 |
परभणी | 108.92 | 95.30 |
धुळे | 106.05 | 92.58 |
नांदेड | 108.24 | 94.71 |
रायगड | 105.96 | 92.47 |
अकोला | 106.05 | 92.55 |
वर्धा | 106.56 | 93.10 |
नंदुरबार | 106.99 | 93.45 |
वाशिम | 106. 37 | 93.37 |
चंद्रपूर | 106.14 | 92.70 |
सांगली | 105.96 | 92.54 |
जालना | 107.76 | 94.22 |
पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).