Petrol Diesel Price Today 1st April : पेट्रोल-डिझेलपाठोपाठ आता एलपीजी (LPG) गॅस सिलेंडरच्या दरांनी सर्वसामान्यांनी धाकधूक वाढवली आहे. अशातच आजचा दिवस सर्वसामान्यांसाठी काहीसा दिलासादायक ठरला आहे. कारण भारतीय तेल कंपन्यांनी आज देशातील इंधन दरांमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. आज आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. असं असलं तरी गेल्या काही दिवसांत सातत्यानं झालेल्या दरवाढीनंतर अनेक शहरांत पेट्रोल-डिझेल शंभरीपार पोहोचलं आहे. 

शुक्रवारी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे नवे दर जारी केले आहेत. आजच्या दरांनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलच्या दरांत प्रति लिटर 85 पैशांची तर डिझेलच्या दरांत 85 पैशांची वाढ झाली आहे. तर दरवाढीनंतर देशाच्या राजधानीत पेट्रोल 116.67 रुपये आणि डिझेल 100.89 रुपयांवर पोहोचलं आहे. मुंबईसह अनेक शहरांमध्ये डिझेलनंही शंभरी ओलांडली आहे.  

दरवाढीचा झटका, हळूहळू देतायत तेल कंपन्या 

देशात 22 मार्च 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत आहेत. 22 मार्च ते 23 मार्चपर्यंत पेट्रोल आणि डिझेल प्रतिदिन 80 ते 80 पैशांनी महागलं. 24 मार्च रोजी कोणताही बदल झाला नाही, मात्र 25 मार्चपासून पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल 26 पर्यंत 80-80 पैशांनी वाढलं. यानंतर 27 मार्च रोजी पेट्रोल 50 पैसे तर डिझेल 55 पैसे महागले. 

28 मार्च रोजी पेट्रोल 30 पैशांनी तर डिझेल 35 पैशांनी वाढले. 29 मार्च रोजी पेट्रोल 80 पैशांनी आणि डिझेल 70 पैशांनी वाढले, 30 मार्चला पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80-80 पैशांनी वाढ झाली आणि 31 मार्चला पेट्रोल आणि डिझेलचे दर 80 पैशांनी वाढले. तर 1 एप्रिल रोजी कोणताही बदल झाला नाही.

देशातील महानगरांतील दर जाणून घ्या 

शहरं  पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर) डिझेलच्या किमती (प्रति लिटर)
मुंबई 116.72  100.94
दिल्ली 101.81  93.07
चेन्नई 107.45  97.52
कोलकाता  111.35  96.22

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).