Petrol-Diesel Price Today 16th November : गेल्या 24 तासांत जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे. तरी याचा परिणाम देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price) किरकोळ किमतींवर झालेला नाही. भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आज जारी केलेल्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चार महानगरांमध्येही पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही.


पेट्रोल-डिझेलच्या किंमतीतील शेवटचा बदल 22 मे रोजी झाला होता. पाच महिन्यांहून अधिक काळ पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. केंद्र सरकारनं 22 मे रोजी उत्पादन शुल्क कमी केलं होतं. त्यामुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झालं होतं. यानंतर महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यानंतर नव्या सरकारनं पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता.


आजच्या तेलाचे दर काय? 


आजच्या कच्च्या तेलाच्या दरांबद्दल बोलायचं झालं तर गेल्या 24 तासांत त्यांच्या किमतीत थोडा बदल झाला आहे. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 93.86 डॉलरपर्यंत वाढली आहे. तसेच, डब्ल्यूटीआयचा दर सुमारे 2 डॉलरने वाढला आणि तो प्रति बॅरल 87.19 डॉलरवर विकला जात आहे.


देशातील महत्त्वाच्या महानगरांतील दर 



  • दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

  • मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर

  • चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

  • कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर


तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) दररोज सकाळी 6 वाजता क्रूडच्या किमतीवर आधारित तेलाचे दर जारी करतात. पेट्रोल किंवा डिझेलच्या दरांत काही बदल झाल्यास त्याची अंमलबजावणी त्याच वेळी केली जाते. वेगवेगळ्या राज्यांमध्ये व्हॅटचे दर वेगवेगळे असल्यानं देशातील प्रत्येक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे असतात.


पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?


इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).