Petrol-Diesel Price Today 14 June 2022 : देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती (Petrol Diesel Rate) सलग 23व्या दिवशी स्थिर आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत 122 डॉलरच्या वर आहे. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा आयातदार आणि ग्राहक आहे. अशातच, रशिया आता सौदी अरेबियाला मागे टाकत भारताचा दुसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार बनला आहे.


सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel) आजचे दर जारी केले आहेत. आजही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे देशातील इंधनाच्या किमती स्थिर आहेत. 


केंद्र सरकारनं 21 मे रोजी केंद्र सरकारनं पेट्रोल (Petrol) -डिझेलच्या (Diesel) किमतींमध्ये घट करत सर्वसामान्यांना काहीसा दिलासा दिला होता. तेव्हापासून देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 21 मे रोजी केंद्र सरकारनं पेट्रोलवरील 8 रुपये आणि डिझेलवरील 6 रुपयांचं उत्पादन शुल्क हटवलं होतं. त्यानंतर देशात पेट्रोल 9.50 रुपये आणि डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झालं होतं.


तेल कंपन्यांनी मंगळवार, 14 जूनसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आज, दिल्लीतील इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल 96.72 रुपये लिटरनं विकलं जात आहे आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तसेच, पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये लिटर आहे.


देशातील महानगरांत पेट्रोल-डिझेलचा दर काय? 


देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोलचा दर 111.35 रुपये तर डिझेलचा दर 97.28 रुपये प्रतिलिटर आहे. तर राजधानी असलेल्या दिल्लीत 1 लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि 1 लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोलची किंमत 106.03 रुपये आहे तर डिझेलची किंमत 92.76 रुपये प्रति लीटर आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्येही पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.


महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांतील दर काय? 


महाराष्ट्रातील मुंबई शहरात गुरुवारी पेट्रोलचा दर 111.35 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 97.28 रुपये प्रति लिटर आहे. तसेच, बृहन्मुंबईमध्ये, पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.53 रुपये आणि डिझेलचा दर 97.45 रुपये प्रति लिटर आहे. आज पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.93 रुपये तर डिझेलचा दर 96.38 रुपये प्रति लिटर आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 111.25 रुपये तर डिझेलचा दर 95.73 रुपये प्रति लिटर आहे. नागपुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.41 रुपये तर डिझेलचा दर 95.92 रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.02 रुपये तर डिझेलचा दर 95.54 रुपये प्रति लिटर आहे.


पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?


इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).