Petrol-Diesel Price Today 13th November : देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर आहेत. अशातच आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही भारतीय तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol-Diesel Price Today) जाहीर करण्यात आले आहेत. आजही तेल कंपन्यांनी देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. महत्त्वाचं म्हणजे, आंतरराष्ट्रीय बाजारातही आज कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये कोणताच बदल करण्यात आलेला नाही. ब्रेंट क्रूड 95.99 डॉलर प्रति बॅरल आणि WTI 88.96 डॉलर प्रति बॅरल दरानं विकलं जात आहे.

आज देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. तर मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये तर डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्येही पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे. 

देशातील प्रमुख महानगरांमधील किंमती काय? 

आज दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई सारख्या शहरांमध्ये एक लिटर पेट्रोल आणि डिझेलचे दर खालीलप्रमाणे आहेत.

शहरं  डिझेलच्या किमती पेट्रोलच्या किमती
दिल्ली 89.62 रुपये प्रति लिटर 96.72 रुपये प्रति लिटर
मुंबई 94.27 रुपये प्रति लिटर 106.31 रुपये प्रति लिटर
चेन्नई  94.24 रुपये प्रति लिटर 106.03 रुपये प्रति लिटर
कोलकाता  92.76 रुपये प्रति लिटर 102.63 रुपये प्रति लिटर

22 मेपासून देशातील पेट्रोल-डिझेलचे दर 'जैसे थेच'

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीतील शेवटचा बदल 22 मे रोजी झाला होता. पाच महिन्यांहून अधिक काळ पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. केंद्र सरकारनं 22 मे रोजी उत्पादन शुल्क कमी केलं होतं. त्यामुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झालं होतं. यानंतर महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यानंतर नव्या सरकारनं पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. 

तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) दररोज सकाळी 6 वाजता क्रूडच्या किमतीवर आधारित तेलाचे दर जारी करतात. पेट्रोल किंवा डिझेलच्या दरांत काही बदल झाल्यास त्याची अंमलबजावणी त्याच वेळी केली जाते. वेगवेगळ्या राज्यांमध्ये व्हॅटचे दर वेगवेगळे असल्यानं देशातील प्रत्येक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे असतात. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).