Petrol-Diesel Price Today 10th November : देशात गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सातत्यानं चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सातत्यानं बदलत असल्या तरी देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये (Petrol-Diesel Price) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. 


तीन दिवसांपूर्वी 100 डॉलरच्या जवळ पोहोचलेल्या कच्च्या तेलात पुन्हा एकदा घसरण होत आहे. ऑगस्ट महिन्यात क्रूडच्या दरांत विक्रमी घसरण झाली होती. मात्र तरीही देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते. गुरुवारी सकाळी, WTI क्रूड सलग तिसऱ्या दिवशी प्रति बॅरल 85.89 डॉलरवर पोहोचलं. तसेच, ब्रेंट क्रूडचा दरही प्रति बॅरल 92.65 डॉलरपर्यंत घसरला.


कच्च्या तेलाच्या दरांत चढ-उतार सुरुच 


मागील काही दिवसांत क्रूडच्या दरांत विक्रमी घसरण झाली होती. त्यानंतर ओपेक (OPEC) देशांनी क्रूडच्या उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून कच्च्या तेलात तेजी आली आहे. गेल्या काही दिवसांत तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत दिलासा देण्याची अपेक्षा होती. पाच महिन्यांहून अधिक काळ देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.


देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या पाच महिन्यांहून अधिक काळ समान पातळीवर कायम आहेत. केंद्र सरकारनं यापूर्वी 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केलं होतं. यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झालं आहे. तेव्हापासून देशातील मेघालय आणि महाराष्ट्र ही दोन राज्य वगळता इतर राज्यांमध्ये दर स्थिर आहेत. 


सरकारी  तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) कच्च्या तेलाच्या किंमतीच्या आधारावर सकाळी 6 वाजता दररोज पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करतात. पेट्रोल किंवा डिझेलच्या दरांत काही बदल झाल्यास त्यांची अंमलबजावणी त्याच वेळी केली जाते. वेगवेगळ्या राज्यांमध्ये व्हॅटचे दर वेगवेगळे असल्यामुळे, प्रत्येक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर सारखे नसतात.


राज्यातील प्रमुख शहरांत दर काय?


नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 
कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 प्रति लिटर