Petrol Diesel Price Today 05 September 2022 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या दीड महिन्यांपासून कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सातत्यानं चढ-उतार पाहायला मिळत आहेत. असं असलं तरीदेखील देशाती पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये मात्र कोणताही गेल्या साडेतीन महिन्यांपासून कोणताही बदल करण्यात आलेला नाही. महाराष्ट्र आणि मेघालय वगळता देशातील इतर राज्यांत गेल्या अनेक साडेतीन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price) स्थिर आहेत. 

कच्च्या तेलाचे आजचे दर 

मेघालय सरकारनं काही दिवसांपूर्वी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या दरांत प्रतिलिटर दीड रुपयांनी वाढ झाली होती. तर, महाराष्ट्रात शिंदे सरकार आल्यानंतर त्यांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करत वाढलेल्या किमतींमध्ये काही दिलासा दिला होता. त्यावेळी महाराष्ट्रात पेट्रोल पाच रुपयांनी तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त झालं होतं. अशातच सध्या कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घट झाली असून कच्चं तेल प्रति बॅरल 90 डॉलरच्या खाली ट्रेड करत आहे. सोमवारी सकाळी WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल 88.29 डॉलरवर पोहोचली. तर दुसरीकडे, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 94.60 डॉलरवर घसरल्याचं दिसून आलं.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या अधिकृत वेबसाइट iocl.com नं जारी केलेल्या दरांनुसार, आज देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ अथवा घट केलेली नाही. नव्या पेट्रोल-डिझेलच्या दरांनुसार, आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. तर देशातील राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे.

महाराष्ट्रातील इतर शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

शहरपेट्रोलच्या किमती डिझेलच्या किमती
मुंबई106.2594.22
पुणे 10592
नागपूर 106.0392.58
नाशिक106.7493.23
हिंगोली107.2993.80
परभणी108.9295.30
धुळे 106.0592.58 
नांदेड 108.2494.71
रायगड 105.9692.47
अकोला 106.0592.55
वर्धा 106.5693.10
नंदुरबार 106.9993.45
वाशिम106. 3793.37
चंद्रपूर106.1492.70
सांगली 105.9692.54
जालना107.76 94.22

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).