Petrol Diesel Price Today 02 October 2022 : कच्च्या तेलाच्या किमतींत (Crude Oil Prices) घसरण सुरूच आहे. शुक्रवारी, ब्रेंट ऑईलची किंमत 1.86 टक्क्यांनी घसरली, ज्यामुळे ते 1.62 डॉलरवरुन घसरुन 85.56 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलं आहे. याशिवाय, कच्च्या तेलाची किंमत WTI 1.83 टक्क्यांनी घसरली असून ती 1.49 डॉलरनं घसरून 79.74 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली आहे. मात्र, त्याचा आजच्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर कोणताही परिणाम झालेला नाही.


आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. देशाच्या राजधानीत आज (रविवार) पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटर इतका आहे. याशिवाय देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर झाला आहे. तसेच, चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर आहे. तर, पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.03 रुपये आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे.


राज्यात परभणीत विकलं जातंय सर्वात महाग पेट्रोल-डिझेल 


 महाराष्ट्रत सर्वात महाग पेट्रोल-डिझेल परभणी जिल्ह्यात विकलं जात आहे. परभणीत सध्याचा पेट्रोलचा दर 109.41 रुपये आणि डिझेलचा दर 95.81 रुपये प्रति लिटर आहे. तर, राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा दर 106.04 रुपये प्रति लिटर असून डिझेलचा दर 92.59 रुपये इतका आहे. पुण्यात पेट्रोलचा दर 105.84 रुपये आणि डिझेलचा दर 92.36 रुपये प्रति लिटर इतका आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.47 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 93.01 रुपये प्रति लिटर इतका आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर 108 रुपये आणि डिझेलचा दर 95.96 प्रति लिटर इतका आहे. 


पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?


इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).