Petrol Diesel Price in 13 October 2022 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Cruid Oil) किमतींत सातत्यानं चढ-उतार होत आहेत. अशा परिस्थितीत पेट्रोल-डिझेलचे दरही (Petrol Diesel Price) कमी होणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे. अशातच भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आज म्हणजेच, गुरुवार 13 ऑक्टोबर 2022 रोजी भारतीय तेल कंपन्यांनी आजही पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल केलेला नाही. देशात दररोज सकाळी 6 वाजता हिंदुस्थान पेट्रोलियम (Hindustan Petroleum), भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल (Indian Oil) या देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात.

21 मे 2022 पासून भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. देशातील महानगरांसह बहुतांश शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. 21 मे रोजी मोदी सरकारनं पेट्रोलवर 8 रुपये आणि डिझेलमध्ये 5 रुपये प्रति लिटर उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर देशातील तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणतेही मोठे बदल केलेले नाहीत. त्यानंतर काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र आणि मेघालयमध्ये इंधनाच्या किमतींत बदल झाला होता. 

कच्च्या तेलाचे दर काय? 

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील अस्थिरता कालही (बुधवारी) कायम राहिली. किमतींत किंचित वाढ झाल्यानंतर जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 93.99 डॉलर प्रति बॅरल राहिला. तर, WTI क्रूडच्या घसरणीनंतर, ते 87.26 डॉलर्सच्या किमतीवर कायम आहे. अलीकडेच, तेल निर्यात करणाऱ्या देशांच्या गटानं म्हणजेच, OPEC नं कच्च्या तेलाचं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींवर होत आहे. 

देशातील महानगरांतील किमती काय? 

शहरं पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर) डिझेलच्या किमती (प्रति लिटर)
मुंबई 106.31 रुपये 94.27 रुपये
दिल्ली 96.72 रुपये 89.62 रुपये
चेन्नई 102.74 रुपये 94.33 रुपये
कोलकाता 106.03 रुपये

92.76 रुपये

राज्यातील प्रमुख शहरांत दर काय?

  • नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  • पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 
  • कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
  • औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 प्रति लिटर 

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).