Petrol Diesel Price in 02 November 2022 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतींमध्ये पुन्हा घट झाल्याचं पाहायला मिळालं. तरीदेखील आज देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये (Petrol Diesel Price) कोणताही बदल झालेला नाही. देशातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. 


iocl.com या अधिकृत वेबसाईटनं दिलेल्या ताज्या अपडेटनुसार, आज 2 नोव्हेंबर (बुधवार) रोजी तेलाच्या किमतींत कोणताही बदल झालेला नाही. 2 नोव्हेंबर रोजी राजधानी दिल्लीतही एक लिटर पेट्रोलचा दर 96.72 रुपये आणि एक लिटर डिझेलचा दर 89.62 रुपये आहे. तर, मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. 


1 नोव्हेंबर रोजी पेट्रोलच्या दरांत प्रतिलिटर 40 पैशांनी कपात केली जाणार असल्याची चर्चा होती. मात्र भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल केलेला नाही. दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्ये पेट्रोलचा दर 96.79 रुपये तर डिझेलचा दर 89.96 रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय गाझियाबादमध्ये पेट्रोल 96.58 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे आणि डिझेलची किंमत 89.75 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. याशिवाय देशातील महानगरांतही पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. 


महानगरांतील इंधन दर 


दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रति लिटर आहे. आर्थिक राजधानी मुंबईत एक लिटर पेट्रोलची किंमत 106.35 रुपये, कोलकात्यात 106.03 रुपये आणि चेन्नईमध्ये 102.63 रुपये आहे. डिझेलबद्दल बोलायचं झालं तर दिल्लीत एक लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये, मुंबई 94.28 रुपये, कोलकाता 92.76 रुपये आणि चेन्नईमध्ये 94.24 रुपये आहे. आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल आणि डिझेल सर्वात महाग आहे. 


देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल कुठे मिळतं? 


पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल विकले जात आहे. इथे पेट्रोल 84.10 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर आहे. 


सरकारी  तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) कच्च्या तेलाच्या किंमतीच्या आधारावर सकाळी 6 वाजता दररोज पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करतात. पेट्रोल किंवा डिझेलच्या दरांत काही बदल झाल्यास त्यांची अंमलबजावणी त्याच वेळी केली जाते. वेगवेगळ्या राज्यांमध्ये व्हॅटचे दर वेगवेगळे असल्यामुळे, प्रत्येक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर सारखे नसतात.


राज्यातील प्रमुख शहरांत दर काय?


नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 
कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 प्रति लिटर