Petrol and Diesel Rate Updates Today : आजचा सलग आठवा दिवस, देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. सरकारी तेल कंपन्यांच्या वतीनं सलग आठव्या दिवशीही पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. इंधनांच्या दरात कोणतीही वाढ न झाल्यामुळे देशाच्या राजधानीत आज पेट्रोल 101.84 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर 89.87 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. गेल्या रविवारी, पेट्रोलच्या किमती स्थिर होत्या. 17 जुलै रोजी पेट्रोलच्या दरांत 30 पैसे प्रति लिटरनं वाढ करण्यात आली होती. तर डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता.
मुंबई शहरामध्ये जिथे पेट्रोलची किंमत 29 मे रोजी पहिल्यांदा 100 रुपयांच्या पार पोहोचल्या आहेत. अशातच आज पेट्रोलची किमत 107.83 रुपये प्रति लिटर आहे. शहरामध्ये डिझेलच्या किमतीही 97.45 रुपये आहे. जी देशातील प्रमुख शहरांमधील सर्वाधिक किंमत आहे. देशाच्या प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलच्या किमती आतापर्यंत 100 रुपये प्रति लिटर पार पोहोचल्या आहे.
लवकरच पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होणार?
देशात इंधनदरवाढीच्या सत्राला ब्रेक लागून पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. कारण तेल कंपन्यांनी जागतिक स्तरांवर तेलाच्या किमती कमी करण्यास सुरुवात केली आहे. बेंचमार्क ब्रेंट क्रूड ज्यामध्ये काही दिवसांपूर्वी वाढ 77 डॉलर प्रति बॅरल झालं होतं, या किमती मागच्या पंधरवड्यात 10 टक्क्यांहून कमी होत 68.85 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. जर या किमती आणखी काही दिवसांसाठी 70 डॉलर प्रति बॅरलहून कमी राहिल्या, तर येणाऱ्या दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये घट होऊ शकते.
देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर :
शहरं | पेट्रोलची किंमत | डिझेलची किंमत |
दिल्ली | 101.84 | 89.87 |
मुंबई | 107.83 | 97.45 |
चेन्नई | 102.49 | 94.39 |
कोलकाता | 102.08 | 93.02 |
बंगळुरु | 105.25 | 95.26 |
भोपाळ | 110.20 | 98.67 |
चंदीगड | 97.93 | 89.50 |
रांची | 96.68 | 94.84 |
लखनौ | 104.25 | 95.57 |
पेट्रोलच्या दरांमध्ये मे महिन्यापासून 41 वेळा वाढ झाली
पेट्रोलच्या दरांत चार मेनंतर 41 वेळा वाढ झाली. तर डिझेलच्या दरांमध्ये 37 वेळा वाढ झाली, तर एकदा दरांमध्ये घट करण्यात आली. सलग तेलांच्या किमतींमध्ये होणाऱ्या वाढीमुळे मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, ओदिशा, तामिळनाडू, केरळ, बिहार आणि पंजाब यांच्यासह 15 राज्यांमध्ये पेट्रोलच्या किमती शंभरी पार पोहोचल्या आहेत. उत्तर प्रदेश आणि हरियाणातील काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रति लिटरनं महाग झालं आहे. डिझेल राजस्थान, ओदिशा आणि मध्यप्रदेशातील काही शहरांमध्ये 100 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे.
देशात 15 जून 2017 पासून इंधनाचे दर रोज बदलण्यास सुरुवात झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता भारतातील तेल कंपन्या ठरवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलत असतात. त्यामुळे देशात आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात.
पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).