Petrol Diesel price hike: सरकारी तेल कंपन्यांनी रविवारी पुन्हा एकदा इंधनात दरवाढ केली. गाझामध्ये तणाव वाढल्यानंतर याचे थेट परिणाम अमेरिका आणि पश्चिम आशियाई देशांमधील तेलाच्या किमतीवर दिसून येत आहेत. ज्यामुळे शनिवारी दिल्लीत पेट्रोलच्या दरात 24 पैशांनी वाढ झाली. ज्यामुळं प्रती लिटरचे दर 92.58 रुपयांवर पोहोचले. तर, डिझेलचे दर 27 रुपयांनी वाढून 83.22 वर पोहोचले. 


यापूर्वी सरकारी तेल कंपन्यांनी 27 फेब्रुवारी 2021 ला डिझेलच्या दरांत 17 पैशांनी वाढ केली होती. यानंतर दोन महिन्यांपर्यंतच्या कालावधीत इंधनाच्या दरांत वाढ झाल्याचं दिसून आलं नव्हतं. पुढे एप्रिलमध्ये डिझेलच्या दरांत वाढ झाल्याचं निदर्शनास आलं. पाच राज्यांमधील निवडणुकांचे निकाल आल्यानंतर डिझेलचे दर  प्रतीलीटरमागे 2.49 रुपयांनी वाढले. 


Cyclone Tauktae Video : तोक्तेचा कहर; केरळमध्ये समुद्रकिनारी बंगला जमीनदोस्त 


जाणून घ्या तुमच्या शहरातील दरांचे आकडे काय म्हणतात... 


सध्याच्या घडीला दिल्लीमध्ये पेट्रोल 92.58 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 83.22 रुपये प्रति लीटर, मुंबईमध्ये पेट्रोल 98.88 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 90.40 रुपये प्रति लीटर, चेन्नईमध्ये पेट्रोल 94.34 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 88.07 रुपये प्रति लीटर, कोलकातामध्ये पेट्रोल 92.67 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 86.06 रुपये प्रति लीटर, भोपाळमध्ये पेट्रोल 100.63 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 91.59 रुपये प्रति लीटर, रांचीमध्ये पेट्रोल 89.57 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 87.90 रुपये प्रति लीटर, बंगळुरुमध्ये पेट्रोल 95.66 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 88.22 रुपये प्रति लीटर, पाटणा येथे पेट्रोल 88.89 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 83.46 रुपये प्रति लीटर, चंडीगढ़मध्ये पेट्रोल 89.05 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 82.60 रुपये प्रति लीटर आणि लखनऊमध्ये पेट्रोल 90.37 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 83.60 रुपये प्रति लीटर इतके झाले.