नवी दिल्ली : देशात इंधानाचे दर शंभरीकडे वाटचाल करत आहेत. पेट्रोल-डिझेल दरवाढीचा परिणाम म्हणून इतर गोष्टींचे दरही वाढत आहेत. गुरुवार आणि शुक्रवार सलग दोन दिवस तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. तेलाव्यतिरिक्त एलपीजी सिलेंडरच्या किंमतीही वाढल्या आहेत. सरकारने सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ केली आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या वाढत्या किंमतींवरून विरोधी पक्ष मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनीही शनिवारी ट्वीट करत सरकारवर हल्ला केला.


राहुल गांधी यांनी एका ट्वीटद्वारे केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधी म्हणाले की, मोदी सरकारने देश आणि घराचे बजेट खराब केले आहे.





Viral Video | पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींवर देसी जुगाड, नेटकरीही हैराण


सलग दोन दिवस इंधन दरवाढ


गुरुवार आणि शुक्रवारी सलग दोन दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. इंधनाच्या किंमतीत सातत्याने वाढ झाल्यामुळे किंमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत आहेत. शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 30 पैसे प्रतिलिटर वाढ करण्यात आली. या वाढीनंतर राज्यात पेट्रोलची किंमत राज्यात विविध ठिकाणी 94 रुपयांच्या पुढे गेली आहे तर डिझेलची किंमत 84 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.


एलपीजी सिलेंडर 25 रुपयांनी महाग


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत असतानाआता एलपीजी सिलेंडरच्या किंमतीही गुरुवारी वाढल्या. एलपीजी सिलिंडरच्या किंमतीतही प्रति सिलिंडरमध्ये 25 रुपये वाढ करण्यात आली. त्यामुळे घराचं बजेटही बिघडलं आहे.