मुंबई: पेट्रोल-डिझेलच्या दरात उद्या पुन्हा एकदा वाढ होणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 83 पैसे वाढ होणार असल्याची माहिती आहे. ही वाढ बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून केली जाणार आहे. त्यामुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. मंगळवारी पेट्रोल प्रतिलीटर 84 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 83 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. 


जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती या 118 डॉलरवर जाऊन पोहोचल्या आहेत. त्यामुळे देशातील इंधनाच्या दरात वाढ करण्यात येत आहे. पाच राज्यांतील निवडणुका संपल्यानंतर ही वाढ होणार अशी शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली होती.


काय आहेत पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर
मुंबईत पेट्रोलचे दर 110.82 रुपयांवर तर डिझेलचे दर 95 रुपये प्रतिलिटर आहेत. दिल्लीत आज पेट्रोलचा दर 96.21 रुपये प्रति लिटरवर तर डिझेलचा दर 87.47 रुपये प्रति लिटरवर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 105.51 रुपये आणि डिझेलचा दर 90.62 रुपये प्रति लिटरवर आला आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.16 रुपयांवर तर डिझेलचा दर 92.19 रुपयांवर पोहोचला आहे.


गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्र सरकारनं पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपये आणि डिझेलवरील (Petrol-Diesel) उत्पादन शुल्क 5 रुपयांनी कमी केलं होतं. त्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.  पाच राज्यातील विधानसभा निवडणूक निकालांनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरांत (Petrol-Diesel Rate) विक्रमी वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानंतरही देशात काही दिवस पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते.


पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?


इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha