Petrol-Diesel Price in India Latest Updates : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमतीमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात 83 डॉलर प्रति बॅरल इतकी किंमत क्रूड ऑईलची झाली आहे. असं असतानाही मागील काही दिवसांपासून देशातील इंधनाचे दर स्थिर आहेत. दिवाळीपासून देशात इंधन दरवाढ झालेली नाही. राज्यस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल-डिझेल देशातील सर्वात महाग मिळतेय. तर पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त. श्रीगंगानगरच्या तुलनेत पोर्ट ब्लेयरमध्ये पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) जवळपास 33 रुपये स्वस्त आहे. ताज्या आकडेवारीनुसार, शनिवारी पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लीटर 82.96 रुपये इतकी आहे. तर डिझेलची किंमत 77.13 रुपये प्रति लीटर इतकी आहे.
भारतीय तेल कंपन्यांनी 3 नोव्हेंबरपासून पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. इंडियन ऑइल कंपन्यानी शनिवारी जारी केलेल्या किंमतीनुसार, आज मुंबईत पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. तर देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत (Petrol Price)103.97 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटरनं आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपयांनी विकलं जात आहे.
देशातील महत्त्वाच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price ) काय?
देशातील महत्त्वाची शहरं | पेट्रोल रुपये/लिटर | डिझेल रुपये/लिटर |
मुंबई | 109.98 | 94.14 |
दिल्ली | 109.69 | 98.24 |
चेन्नई | 104.67 | 89.79 |
कोलकाता | 101.40 |
91.43 |
पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).
या राज्यांनी व्हॅट केला कमी -
केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात कपात करण्यात आल्यानंतर आसाम, त्रिपुरा, गोवा, उत्तर प्रदेश, गुजरात, उत्तराखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, मणिपूर आणि कर्नाटक सरकारनं पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात घट केली होती. त्यासोबत हरियाणामध्येही व्हॅट कमी करण्याची घोषणा करण्यात आली होती. या सर्व राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. दरम्यान, पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांची सत्ता असलेल्या अनेक राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट अद्याप कमी करण्यात आलेला नाही.