Petrol-Diesel Price 11 December Updates :  आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार होत असताना दुसरीकडे आज इंधन कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. मागील महिनाभरापासून इंधन कंपन्यांनी इंधन दर स्थिर ठेवले आहेत. काही दिवसांपूर्वी कच्च्या तेलाचे दर कमी झाले तरी इंधन कंपन्यांनी दरात कपात केली नव्हती. 


राजधानी दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई या महानगरांमध्ये सोमवारीदेखील पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिलेत. दिल्लीत पेट्रोलचा दर 95.41 प्रतिलीटर आणि डिझेलचा दर 86.67 प्रतिलीटर आहे. मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अनुक्रमे 109.98 प्रतिलीटर आणि 94.14 प्रतिलीटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 104.67 रुपये प्रतिलीटर आणि डिझेलचा दर 89.79 रुपये प्रतिलीटर तर कोलकातामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर  अनुक्रमे 101.40 रुपये आणि 91.43 रुपये आहेत.


पुण्यात पेट्रोलचा दर प्रतिलीटर 110.12 इतका आहे. तर, डिझेल 92.89 रुपये प्रतिलीटर आहे. पेट्रोलमध्ये 26 पैसे आणि डिझेलमध्ये 25 पैशांनी दरवाढ करण्यात आली आहे. नागपूरमध्ये  पेट्रोल दर 110.32 रुपये प्रतिलीटर इतका असून डिझेलची किंमत 93.11 रुपये प्रतिलीटर इतकी आहे. नागपूरमध्येही पेट्रोलच्या दरात 61 पैसे आणि डिझेलच्या दरात 58 पैसे दरवाढ झाली आहे.


पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?


इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).