Petrol and Diesel Prices Today: सरकारी तेल कंपन्यांकडून आज सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही. गेल्या सहा दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे, असंच म्हणावं लागेल. 27 फेब्रुवारी रोजी पेट्रोल डिझेलच्या भावात वाढ झाली होती.


राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 91.17 रुपये तर डिझेलचा दर 81.47 रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोलचा दर 97.57 रुपये आणि डिझेलचा दर 88.60 रुपये प्रति लिटर आहे.


महत्वाच्या शहरातील किमती खालीलप्रमाणे
शहर         पेट्रोल         डिझेल
दिल्ली        81.47      91.17
कोलकाता  84.35      91.35
मुंबई          88.60        97.57
चेन्नई          86.45       93.11


Petrol-Diesel Prices: पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?



पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर तीन सोप्या पद्धतीने पाहता येतील. तुम्ही तुमच्या जिल्हाचं, तालुक्याचं लोकेशन सिलेक्ट करुन किंवा पेट्रोल पंपाचं नाव https://associates.indianoil.co.in/PumpLocator/ या लिंकवर टाकून इंधनाचे दर काय आहेत याची माहिती घेऊ शकता. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकते. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत)
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.


Petrol and Diesel price | पेट्रोल-डिझेलच्या किंंमतीवर काही बोलणं म्हणजे 'धर्मसंकट': केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण