Petrol and Diesel Prices Today : तेल कंपन्यांनी आज (21 जून) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही, त्यामुळे आज इंधराचे दर स्थिर आहेत. आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचा दर 103.36 रुपये तर डिझेलचा दर 95.44 रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय दिल्लीच्या बाजारात पेट्रोल (Petrol) 97.22 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलचा (Diesel) दर 87.97 रुपये प्रति लिटर आहे. रविवारी (20 जून) इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली होती, पेट्रोल 29 पैसे तर डिझेल 28 पैशांनी महागलं होतं.
देशातील प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर प्रति लिटर असे आहेत....
शहरं पेट्रोल डिझेल
दिल्ली 97.22 87.97
मुंबई 103.36 95.44
कोलकाता 97.12 90.82
चेन्नई 98.40 92.58
20 जून रोजी पेट्रोल 29 पैसे तर डिझेल 28 पैशांनी महागलं!
भारतीय बाजारात इंधनाच्या दरात वाढ सुरुच आहे. तेल कंपन्यांनी 20 जून रोजी पेट्रोलचे दर 29 पैसे प्रति लिटर आणि डिझेल दर 28 पैसे प्रति लिटर वाढवण्यात आले. यानंतर राजधानी दिल्लीत पेट्रोल 97 रुपये प्रति लिटरच्या पार पोहोचलं तर डिझेल 88 रुपये प्रति लिटरच्या जवळ पोहोचलं.
या शहरांमध्ये पेट्रोलची शंभरी पार
राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलचा दर 100 रुपये प्रति लिटरच्या पार गेला आहे. याशिवाय महानगरांपैकी मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरुमध्ये पेट्रोलने आधीच 100 रुपये प्रति लिटरचा आकडा पार केला आहे.
प्रमुख शहरांमधील 20 जून रोजीचे पेट्रोल-डिझेलचे दर
- दिल्लीमध्ये पेट्रोल 97.22 रुपये आणि डिझेल 87.97 रुपये प्रति लिटर
- मुंबईमध्ये पेट्रोल 103.36 रुपये आणि डिझेल 95.44 रुपये प्रति लिटर
- चेन्नईमध्ये पेट्रोल 98.40 रुपये आणि डिझेल 92.58 रुपये प्रति लिटर
- कोलकातामध्ये पेट्रोल 97.12 रुपये आणि डिझेल 90.82 रुपये प्रति लिटर
- भोपालमध्ये पेट्रोल 105.43 रुपये आणि डिझेल 96.65 रुपये प्रति लिटर
- बंगळुरुमध्ये पेट्रोल 100.47 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लिटर
- रांचीमध्ये पेट्रोल 93.13 रुपये आणि डिझेल 92.86 रुपये प्रति लिटर
असे जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर
पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel) दर दररोज अपडेट केले जातात. तुम्ही केवळ एका एसएमएसद्वारे आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑईलच्या (IOCL) ग्राहकांनी RSP कोड लिहून 9224992249 नंबरवर पाठवायचा. तुमच्या शहराचा RSP कोड जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.