Petrol and Diesel Price Today : गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतींत वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेल 85 डॉलर्सच्या पुढे जात आहेत. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत (Petrol-Diesel Prices) कोणताही बदल झालेला नाही. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांच्या नव्या वक्तव्यानंतर आगामी काळात तेलाच्या किमतीत काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 

अर्थमंत्र्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्या म्हणाल्या की, "जर राज्य सरकारे सहमत असतील आणि जीएसटी कौन्सिलही सहमत असेल तर पेट्रोलियम उत्पादने जीएसटीच्या कक्षेत आणता येतील. यानंतर जीएसटी दर निश्चित केला जाईल. पेट्रोलियम मंत्रालय गेल्या काही वर्षांपासून पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे अर्थमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर आता खरंच पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती काय? 

देशातील महानगरांत आज पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. देशाच्या राजधानीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईबद्दल बोलायचं झालं तर, येथे पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. याशिवाय, चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लीटर आहे. त्याचवेळी कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दराने विकलं जात आहे.

Petrol Diesel Price Today : देशांतील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

देशातील महानगरं पेट्रोल (प्रति लिटर) डिझेल (प्रति लिटर)
दिल्ली 96.72 रुपये 89.62 रुपये
मुंबई 106.31 रुपये 94.27 रुपये
कोलकाता 106.03 रुपये 92.76 रुपये
चेन्नई  102.63 रुपये 94.24 रुपये

Petrol Diesel Price Today : राज्यात कोणत्या शहरात किती दर? 

  • नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  • पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 
  • कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
  • औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर 
  • परभणी : 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
  • नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).