नवी दिल्ली: पेन्शन कमी करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही आणि सरकार या संदर्भात कोणताही विचार करत नाही. असे वित्त मंत्रालयाने ट्विटरवर स्पष्ट केले आहे. सरकार पेन्शन कमी करण्याचा किंवा थांबविण्याच्या विचारात असल्याच्या अफवा असल्याचे देखील त्यांनी सांगितले..


वित्त मंत्रालयाने ट्विटरवर लिहिले की, "केंद्र सरकारच्या निवृत्ती वेतनधारकांच्या निवृत्ती वेतनात 20 टक्के कपात केल्याचे वृत्त आहेत. ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. पेन्शनमध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही. सरकारच्या रोकड व्यवस्थापनाच्या निर्देशावरून पगार व निवृत्तीवेतनावर परिणाम होणार नाही हे स्पष्ट आहे".





मंत्रालयाचे वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनीही ट्विट केले. त्याचबरोबर सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वी स्पष्टीकरण देण्यात आले आहे आणि पुन्हा पुनरावृत्ती केली जात आहे, पेन्शन कमी करण्याचा प्रस्ताव नाही. सरकार या संदर्भात विचार करत नाही. सरकार पेन्शनधारकांचे कल्याण आणि कार्यक्षमतेसाठी वचनबद्ध आहे. केंद्र सरकार अंतर्गत देशभरात 65.26 लाख पेन्शन लाभार्थी आहेत.


संबंधित बातम्या :