Patna Opposition Meeting: पाटण्यात शुक्रवारी पार पडलेली बैठक यशस्वी करायची असेल, तर काँग्रेसला (Congress) मोठा त्याग करावा लागणार आहे. हे जवळपास निश्चित आहे. कारण, अनेक राज्यांमध्ये काँग्रेसपेक्षा जास्त प्रभाव स्थानिक पक्षांचा आहे. आणि स्थानिक पक्षांच्या प्रभावामुळे काँग्रेसला गेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये चांगलाच फटका बसलाय. आता आगामी निवडणुकांमध्ये जर हेच नुकसान टाळायचं असेल तर काँग्रेसला जागांमध्ये मोठी तडजोड करावी लागणार हे स्पष्ट आहे... असं असलं तरी अनेक राज्यांमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप असाच सामना होणार आहे.
राहुल गांधींचा विश्वास पूर्ण करायचा असेल तर पाटण्यात जी विरोधकांची एकजूट दिसली. 2024 पर्यंत कायम राहिली पाहिजे. मात्र यामध्ये एक अडचण आहे. कारण बैठकीत लोकसभेच्या 450 जागांवर एक उमेदवार देण्याबाबत चर्चा झाली आहे. जर तोच निर्णय झाला तर काँग्रेसलाच सर्वात मोठा धक्का बसेल. कारण काँग्रेसनं आजपर्यंत एकदाही 400 पेक्षा कमी जागांवर निवडणूक लढवली नाही.
काँग्रेस 400 पेक्षा कमी जागा लढणार?
वर्ष |
लढलेल्या जागा |
जिंकलेल्या जागा |
2004 | 400 | 145 |
2009 | 440 | 206 |
2014 | 464 | 44 |
2019 | 421 | 52 |
आता काँग्रेसनं जर विरोधकांच्या मुद्द्यांनुसार ही बाब मान्य केली तर काँग्रेसला 400 जागा मिळणार नाहीत. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या निकालाची थोडी फोड केली. काँग्रेसनं लढवलेल्या 421 जांगापैकी 209 जागांवर काँग्रेसचे उमेदवार दुसऱ्या स्थानावर होते. त्यापैकी 175 ठिकाणी भाजपला विजय मिळाला होता.
आजघडीला काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढती कुठे कुठे आहेत..
राज्य लोकसभेच्या जागा
मध्य प्रदेश 28
कर्नाटक 20
गुजरात 26
राजस्थान 25
छत्तीसगड 11
आसाम 14
हरियाणा 11
हिमाचल 04
उत्तराखंड 05
गोवा 02
अरुणाचल प्रदेश 02
मणिपूर 02
त्याचबरोबर चंदीगड, अंदमान निकोबारच्या प्रत्येकी दोन आणि लडाखच्या एका जागेवर काँग्रेस-भाजप थेट लढत असेल. त्याशिवाय पंजाब, महाराष्ट्र, बिहार, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि केरळमधील 38 जागांवरही काँग्रेसचीच थेट लढत भाजपशी होणार आहे त्यामुळे काँग्रेसला एकास एक उमेदवार हा प्रस्ताव मान्य होईल का? कारण, जर हा प्रस्ताव मान्य झाला. तर काँग्रेसच्या वाट्याला 220 ते 240 जागाच येतील..
कर्नाटकातील विजयानंतर काँग्रेस हा प्रस्ताव मान्य करणार का?
कर्नाटकातील विजयानंतर पक्षानं आपण 350 जागांपेक्षा कमी जागा लढवणार नाही असा दावा केला होता. अशा परिस्थिती मित्रपक्षांना फक्त 193 जागा उरतील त्या त्यांना मान्य असतील का? शिवाय काँग्रेसनं मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्येही तयारी सुरु केलीय.तिथं जर काँग्रेसला यश आलं. तर मात्र या फॉर्म्युल्याचं काय होणार..याबाबत आज तरी स्पष्टता नाही.
आजची बैठक ही फक्त औपचारिकताच मानावी लागेल. लोकसभेला एक वर्ष बाकी आहे.त्यात जर मोदींना आव्हान द्यायचं असेल तर मात्र काँग्रेसला मोठा त्याग करावा लागणार आहे.हे जवळपास स्पष्ट आहे..