Parliament Winter Session Updates: राज्यसभेतील 12 खासदारांच्या निलंबनानंतर आज संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी लोकसभेनंतर आता राज्यसभेतूनही विरोधकांनी सभात्याग केला आहे. अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी खासदारांचे निलंबन मागे घेण्यास नकार देत सांगितलं की, ''12 खासदारांचं निलंबन नियमानुसार करण्यात आलं आहे. विरोधकांनी आज चर्चा करावी किंवा सभात्याग करावा.''
खासदारांच्या प्रचंड गदारोळानंतर लोकसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केंद्रावर हल्लाबोल करताना म्हटलं की, ''सरकारचा धमकावण्याचा हा नवा प्रकार असल्याचं म्हटलं आहे. सरकार बळजबरीनं माफी का मागायला लावतं आहे ? सरकारची अशी वृत्ती पहिल्यांदाच पाहिली.''
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी खासदारांच्या निलंबनाचा निषेध करत म्हटलं की, "आम्ही 12 खासदारांचं निलंबन मागे घेण्याची विनंती करण्यासाठी आलो होतो. घटना गेल्या पावसाळ्यातील आहे. मग आता हा निर्णय कसा घेण्यात येऊ शकतो?''
राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी निलंबनाचा निर्णय कायम ठेवला
व्यंकय्या नायडू यांनी यावेळी म्हटलं की, ''गेल्या पावसाळी अधिवेशनातील वाईट अनुभव अजूनही आपल्यापैकी बहुतेकांना सतावतो. गेल्या अधिवेशनात जे काही घडले त्याबद्दल सभागृहातील प्रमुख नेते नाराजी व्यक्त करण्यासाठी पुढे येतील, अशी आशा आणि वाट पाहत होतो. राज्यसभेच्या अध्यक्षांना कारवाई करण्याचा अधिकार आहे आणि सभागृहही कारवाई करू शकते.''
महत्त्वाच्या बातम्या :
- 12 Rajya Sabha MP Suspended : पुरुष मार्शलनी महिला खासदारांना धक्काबुक्की केली, प्रियांका चर्तुवेदी यांची निलंबनावर प्रतिक्रिया
- RajyaSabha MP suspended : खासदारांच निलंबन नाट्यमय, विधेयक मंजूरीसाठी सरकारचा डाव, सुप्रिया सुळेंचा घणाघात
- राज्यसभेत 12 खासदार आणि महाराष्ट्रात 12 आमदार निलंबित आणि आमदारकीच्या प्रतिक्षेत बारा!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha