Petrol, Diesel Price Today, Petrol Diesel Rate 30 November : आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये (Crude Oil) मोठी घट पाहायला मिळत आहे. परंतु, देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती मात्र गेल्या 27 दिवसांपासून स्थिर आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी आजसाठी पेट्रोल-डिझेलच्या किमती जारी केल्या आहेत. दरम्यान, कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये अशीच घट सुरु राहिली तर मात्र येत्या काही दिवसांत पेट्रोल (Petrol) आणि डिझेल  (Diesel) स्वस्त होऊ शकतं. 

जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर आणखी काही दिवस घसरण्याची शक्यता आहे. ही घसरण कायम राहिल्यास भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट होण्याची शक्यता आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशांतर्गत किरकोळ किमती 15 दिवसांच्या 'रोलिंग' सरासरीच्या आधारे ठरवल्या जातात. अशा स्थितीत जागतिक स्तरावर दर सातत्याने घसरल्यानंतरच देशात इंधनाचे दर कमी होतील. 

IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांत (Petrol-Diesel Price In Mumbai) पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत  94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Petrol-Diesel Price In Pune) पेट्रोलची किंमत 109.45 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 92.25 रुपये प्रति लिटर इतकी आहे. 

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत (Petrol-Diesel Price In Delhi) पेट्रोलची किंमत (Petrol Price) 103.97 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत  86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे. याशिवाय देशातील इतर महानगरांपैकी महत्त्वाचं शहर असणाऱ्या चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटरनं आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपयांनी विकलं जात आहे. 

देशातील महत्त्वाच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती (Petrol Diesel Price ) काय?

देशातील महत्त्वाची शहरं पेट्रोल रुपये/लिटर डिझेल रुपये/लिटर
मुंबई  109.98 94.14
दिल्ली 109.69  98.24
कोलकाता  104.67  89.79
चेन्नई  101.40 91.43

(टिप : वरील सर्व दर goodreturns.in या वेबसाईटवरुन घेण्यात आलेले आहेत.)

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा