पाकिस्तान आतापर्यंत अनेक वर्ष दाऊद त्यांच्या इथे नसल्याचा दावा करत होता. पण आज अखेर दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचे त्यांनी मान्य केलंय. फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सच्या ब्लॅक लिस्टमध्ये जाण्यापासून स्वत:ला वाचवण्यासाठी पाकिस्तानने ही कारवाई केल्याचे दाखवले आहे.
SSR Case: शेजारी राहणाऱ्या महिलेचा दावा, 'त्या' दिवशी सुशांतच्या फ्लॅटमध्ये पार्टी झालीच नाही
कराचीच्या क्लिफ्टन परिसरात दाऊदचं वास्तव्य
पाकिस्तान सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत कराची क्लिफ्टन, सौदी मशिदीजवळ व्हाइट हाऊस असा दाऊदचा पत्ता दिला आहे. पाकिस्तानने 88 दहशतवादी संघटना आणि त्यांच्या म्होरक्यांवर निर्बंधांची कारवाई केली आहे. त्यात दाऊदच्या नावाचा समावेश आहे.
दहशतवादाला पैसा आणि अन्य माध्यमातून खतपाणी घालणाऱ्या देशांवर FATF चे बारीक लक्ष असते. या संघटनेच्या ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानने कारवाई केल्याचे दाखवले आहे. हाफीज सईद, मसूद अझर या दहशतवाद्यांवर सुद्धा पाकिस्तानने निर्बंधांची कारवाई केली आहे. पॅरिस स्थित FATF संघटनेने जून 2018 साली पाकिस्तानचा ग्रे यादीत समावेश केला. पाकिस्तानने निर्बंध घातलेल्या 88 संघटनांमध्ये भारतविरोधी कारवाया करणारे अनेक दहशतवादी आणि संघटनांचा समावेश आहे.
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड दाऊद इब्राहिम
मुंबई हल्ल्यातील मास्टरमाइंड दाऊद इब्राहिम आहे. त्याने 1993 रोजी मुंबई मध्ये बॉम्ब स्फोट घडवून आणला होता. यानंतर तो कुटुंबासहित मुंबईतून पळाला होता. दाऊदचं नाव भारतच्या मोस्ट वांटेड लिस्ट मध्ये आहे.
Dawood In Pakistan | दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये, दाऊदबद्दल पाकिस्तानची पहिल्यांदाच जाहीर कबुली