अटक करण्यापूर्वी रात्री11.12 वाजता दिल्लीच्या पोलिस आर्मा स्कूलजवळ पोलीस आणि अतिरेक्यामध्ये चकमक उडाली. पोलिसांनी धडक कारवाई करत अतिरेक्याला बेड्या ठोकल्या. या दहशतवाद्याचं नाव मोहम्मद युसुफ असं आहे. त्याच्याजवळून आयईडी स्फोटकांसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. घटनास्थळावरून दोन अतिरेकी फरार झाले असल्याची माहिती आहे.
राजधानी दिल्लीत आधीपासून अलर्ट जारी केलेला आहे. गुप्तचर एजेंसीला तीन दहशतवादी भारतात घुसल्याची माहिती मिळाली होती. हे दहशतवादी कोणत्यातरी व्हिआयपीला निशाणा बनवणार होते आणि मोठा बॉम्बस्फोट करणार होते. त्या व्हिआयपी व्यक्तीचं नाव अजून समोर आलेलं नाही. दिल्ली पोलिस आता पकडलेल्या दहशतवाद्याची चौकशी करत आहेत.
दिल्लीत छापामारी सुरु
दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे की, जर फरार झालेल्या दहशतवाद्याला पकडलं गेलं नाही तर भविष्यात धोक्याची घंटा आहे. यामुळं दिल्ली पोलिसांच्या सहा टीम त्यांच्या शोधात आहेत. या टीमने वेगवेगळ्या ठिकाणी रेड टाकायला सुरुवात केली आहे.