Pakistan Blast : पाकिस्तान पुन्हा एकदास्फोटाने हादरलं आहे. या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार मंगळवारी, कराची विद्यापिठातील परिसरात एका कार बॉम्बस्फोटात तीन चिनी नागरिकांसह चार जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितनुसार हा एक टार्गेटेड हल्ला होता. यामध्ये चायनीज शिक्षक हल्लेखोरांच्या निशाण्यावर होते. या हल्ल्यात दोम जण जखमी झाले आहेत. 


जियो न्यूजने दिलेल्या रिपोर्टनुसार, ही घटना कन्फ्यूशियस इंस्टीट्यूटजवळ घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, कराची विद्यापाठीतील कन्फ्यूशियस इंस्टीट्यूटजवळ उभ्या असलेल्या एका व्हॅनमध्ये स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर सुरक्षा एजन्सी घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर पूर्ण परिसराला सील करण्यात आले आहे. बचावकार्य सुरू आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॅनमध्ये सात ते आठ जण होते. आतापर्यंत अचूक आकडा समोर आलेला नाही. सुरूवातीला गॅस सिलेंडरमुळे स्फोट झाल्याचे सांगण्यात आले होते. पोलीसांनी अद्याप स्फोट कशामुळे झाला याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार  कन्फ्यूशियस इंस्टीट्यूटमधून ही व्हॅन परतत होती. कराची विद्यापीठातील हे चिनी भाषा केंद्र आहे. 


जियो न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, दोन परेदशी नागरिक गेस्ट हाऊसमधून विभागाकडे चालले होते. त्यावेळी अचानक व्हॅनमध्ये स्फोट झाला. माजी पोलिस उपमहानिरीक्षक मुकद्दस हैदर यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, सध्या हल्ला कसा झाला याबाबत बोलणे योग्य नाही. तर पोलीस अधीक्षक म्हणाले, या हल्ल्याची चौकशी सुरू असून हा अपघात आहे की, दहशतवादी कृत्य याची माहिती चौकशीनंतर समोर येईल. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :