Ayodhya Ram Temple: अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमानंतर पाकिस्तानी स्वतःच्याच देशावर भडकले, म्हणाले, मंदिर कितीही चांगले बांधले तरीही...

Ram Mandir Pran Pratistha: पाकिस्तानी लोक हे देशापेक्षा स्वतःचा जास्त विचार करतात, या उलट भारताचं असल्याचं एका पाकिस्तानी नागरिकाने म्हटलं आहे. 

Continues below advertisement

Ram Mandir Pran Pratistha : अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची चर्चा जगभर सुरू आहे. पाकिस्तानही यातून सुटला नसल्याचं चित्र आहे. इस्रोने एक दिवसापूर्वी राम मंदिराचा सॅटेलाइट फोटो (ISRO Photo Of Ayodhya Ram Temple) प्रसिद्ध केला होता, त्यावर पाकिस्तानमधील लोकांचे मत काय असं त्याच देशातील एका यूट्यूबरने विचारलं होतं. यावेळी पाकिस्तानमधील लोक हे त्यांच्याच देशावर भडकल्याचं समोर आलं. 

Continues below advertisement

अयोध्येतील राम मंदिराच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाकिस्तानच्या एका युट्युबरने त्यावर चर्चा केली. पाकिस्तानच्या रियल एंटरटेनमेंट टीव्हीने लोकांशी संवाद साधला तेव्हा त्या लोकांनी पाकिस्तानला शिव्या द्यायला सुरू केले. भारतीय अंतराळ संस्था इस्रोने रविवारी राम मंदिराचे सॅटेलाइट फोटो प्रसिद्ध केले होते. रिअल एंटरटेनमेंट टीव्हीचे सुहेल चौधरी यांनी याचे वर्णन भारतातील अध्यात्म आणि तंत्रज्ञानाचे मिश्रण म्हणून केले आहे.

जेव्हा पाकिस्तानमधील लोकांना विचारण्यात आले की, भारत तंत्रज्ञानासोबतच अध्यात्मातही पुढे का आहे? यावर एक व्यक्ती म्हणाली, कारण आमचे लक्ष देशावर नाही तर स्वतःवर आहे. एका व्यक्तीने सांगितले की, पाकिस्तानही तंत्रज्ञानात पुढे जाऊ शकतो, पण आपण स्वतः बनवलेले नियम कधीच पाळत नाही. पाकिस्तान कुठे चालला आहे माहीत नाही. बांगलादेश आपल्यापासून वेगळा झाला आणि स्वतःच्या प्रगतीचा मार्ग तयार केला.

पाकिस्तानी लोक त्यांच्या देशावर नाराज आहेत

एका व्यक्तीने सांगितले की, पाकिस्तानचे जगभरात चांगले नाव आहे. पण आज आपण फसवणुकीसाठी जगभर प्रसिद्ध झालो आहोत. भारताबाबत एका व्यक्तीने सांगितले की, भारतीय लोक स्वतःच्या देशाचा विचार करतात. पाकिस्ताननेही स्वतःचा विचार करायला हवा, पण आम्ही ते करत नाही. इस्लामच्या एका तज्ज्ञाने पाकिस्तानचा हवाला देत म्हटले की, धर्म हा मशिदी आणि मदरसांपुरता मर्यादित नसावा. दीनची शिकवण आपण आपल्या जीवनात लागू करणे महत्त्वाचे आहे.

भारतातील मंदिरांमध्ये लोखंडाचा वापर होत नाही, आपणही असे तंत्रज्ञान वापरावे का? असा प्रश्न पाकिस्तानी लोकांना विचारण्यात आला. त्यावर एका व्यक्तीने सांगितले की, आपण मंदिर किंवा मशीद कितीही चांगली बनवण्याचा प्रयत्न करा, जोपर्यंत त्याचा उद्देश आपल्याला माहिती नसतो तोपर्यंत आपल्या आचरणात काहीच फरक पडणार नाही.

ही बातमी वाचा:

 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola