Pahalgam Terror Attack: भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती कायम आहे. यादरम्यान अनेक वक्तव्ये, बैठका यांची माहिती समोर येत आहे. भारतीय नौदलाने अरबी समुद्रात युद्ध सराव सुरू केला आहे. त्यांनी आपल्या युद्धनौका समुद्रात पाठवल्या आहेत, पण त्याची सुरुवात पाकिस्ताननेच केली आहे. पाकिस्तानने त्यांच्या सीमेजवळील समुद्रात सराव सुरू केला होता. दरम्यान, पाकिस्तानचं एक मोठं गुपित उघड झालं आहे. त्याच्याकडून एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे, ज्यामध्ये लढाऊ विमाने दिसत होती.


पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची चर्चा सुरू असतानाच्या दरम्यान, पाकिस्तानी हवाई दलाने सोशल मिडिया एक्स X वरती एक व्हिडिओ शेअर केला आहे. हे फुटेज एका व्हिडिओ गेमचा भाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. पाकिस्तानी हवाई दलाने यामध्ये तुर्की लढाऊ विमानांचा वापर केला होता, परंतु ते त्यांचे स्वतःचे असल्याचा दावाही केला होता. ते आता X वरती उघड झाले आहे.


पाकिस्तानने व्हिडिओ गेमचं वापरलं फुटेज 


पाकिस्तान वायुसेनेने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, फुटेजचा काही भाग हा व्हिडिओ गेममधील असल्याचं निष्पन्न झालं आहे. यातून पाकिस्तानने स्वतःचं हासू करून घेतलं आहे. पाकिस्तानने अलीकडेच तुर्कीकडून मदत मागितली होती. वृत्तानुसार, तुर्कीहून एक गुप्त विमान पाकिस्तानात पोहोचले. त्यात दारूगोळा होता. पाकिस्तानलाही भारताची भीती वाटते. त्याला भीती आहे की भारत कधीही हल्ला करू शकतो.


भारतीय सैन्याने ऑपरेशन केलं सुरू 


पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने अनेक ठिकाणी शोध मोहीम सुरू केली आहे. यादरम्यान, जम्मू-काश्मीरमधील अनेक स्थानिक दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली. पहलगाममध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला.या हल्ल्यात अनेक स्थानिक दहशतवादीही सहभागी असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय लष्करानेही नियंत्रण रेषेवर हालचाली तीव्र केल्या आहेत. घुसखोरीच्या प्रयत्नात अनेक दहशतवादी मारले गेले आहेत.


पाकिस्तानी सैन्याचे घसरतंय मनोबल


टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी सैन्यातही मनोबल घसरल्याच्या बातम्या आल्या आहेत. व्हायरल झालेल्या एका पत्रात मोठ्या संख्येने लोक सैन्यातून राजीनामा मागत असल्याचे सांगितले आहे. मात्र, याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, हे वृत्त देखील पाकिस्तानने नाकारलेलेही नाही. त्यामुळे या चर्चांना आणखी बळ मिळाले. 


पाकिस्तानचे लष्करी बजेट


पाकिस्तानचे लष्करी बजेट फक्त 7.6 अब्ज डॉलर्सवर अडकले आहे, जे भारताच्या तुलनेत खूपच नगण्य आहे. तज्ज्ञांच्या मते, नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या सक्तीच्या लष्करी तैनातीचा खर्च दररोज 15-30 लाख डॉलर्स इतका होत आहे. हा त्यांच्या कमकुवत परकीय चलन साठ्याला आणि ढासळत्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का आहे.