Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack ) 26 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दरम्या, या घटनेनंतर पुन्हा एकदा राष्ट्रीय तपास संस्था (NIA ) चर्चेत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याची चौकशी करण्याचे आदेश एनआयएला देण्यात आले आहेत. त्यानंतर एजन्सीने तपास सुरू केला आहे. अशा परिस्थितीत देशभरातील तरुणांमध्ये एनआयएबद्दल उत्सुकता वाढली आहे. एनआयएमध्ये नोकरी कशी मिळते? त्यासाठी किती शिक्षण हवे? यासाठी किती अभ्यास आवश्यक आहे? कोणती परीक्षा द्यावी लागेल? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
एनआयए म्हणजे काय? नेमकं काय करते काम?
राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ही भारत सरकारची एक केंद्रीय तपास संस्था आहे. जी 26/11 च्या मुंबई हल्ल्यानंतर 2009 मध्ये स्थापन झाली आहे. त्याचे मुख्य काम दहशतवाद, बनावट चलन, अंमली पदार्थांची तस्करी, मानवी तस्करी आणि संघटित गुन्हेगारी यासारख्या प्रमुख प्रकरणांचा तपास करणे आहे.
एनआयएमध्ये नोकरी कशी मिळवायची?
एनआयएमध्ये अधिकारी होण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत. एसएससी सीजीएल परीक्षेद्वारे, जी उपनिरीक्षक पदाकडे जाते. यूपीएससी परीक्षेद्वारे, आयपीएस, आयआरएस सारख्या पदांसाठी निवड होऊ शकते आणि एनआयएमध्ये पोस्टिंग मिळू शकते. याशिवाय, जे आधीच कोणत्याही कायदा अंमलबजावणी संस्थेत काम करत आहेत ते देखील बदली किंवा प्रतिनियुक्तीद्वारे एनआयएमध्ये सामील होऊ शकतात.
एसएससी सीजीएल परीक्षा प्रक्रिया काय आहे?
एसएससी सीजीएल परीक्षा चार टप्प्यात घेतली जाते (टियर 1 ते टियर 4). सर्व टप्पे पार केल्यानंतर, शारीरिक चाचणी आणि मुलाखत असते. एनआयएमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर यशस्वी उमेदवारांना उपनिरीक्षक सारख्या पदांवर नियुक्त केले जाते.
एनआयए अधिकाऱ्यांना किती मिळतो पगार?
एनआयएमध्ये उपनिरीक्षक म्हणून नियुक्त झालेल्या अधिकाऱ्याला सुरुवातीचा पगार सुमारे 56100 रुपये मिळतो. याशिवाय, केंद्रीय भत्ते, प्रवास सुविधा, घरभाडे भत्ता आणि विशेष जोखीम भत्ता देखील उपलब्ध आहे. शिवाय, उच्च पदांवर पगार आणि सुविधांमध्ये आणखी वाढ होते.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास आता तीव्र झाला आहे. या हल्ल्यात 26 पर्यटक ठार झाले होते. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) पथक आता जम्मूमध्ये पोहोचले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या:
Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामागील सूत्रधार कोण? NIAचं पथक पोहचलं जम्मूत; तुरुंगातील दोन दहशतवाद्यांच्या साथीदारांची कसून चौकशी!